3 people died on parel bridge Bike Truck accident marathi latest news  
मुंबई

Parel Bridge Accident : परळ ब्रिजवर भीषण अपघात! ट्रकला धडकल्याने दुचाकीवरून ट्रिपल सीट निघालेले तीघे ठार

अपघातात दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्यांना तिघांचाही यात मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन तरुणींसह एका तरुणाचा समावेश आहे.

रोहित कणसे

मुंबईतील परळ ब्रिजवर बाईक आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात तीन जणांचा मृत्य झाला आहे. बाईकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रकला धडक बसली. अपघातात दुचाकीवरून ट्रिपल सीट जाणाऱ्यांना तिघांचाही यात मृत्यू झाला असून मृतांमध्ये दोन तरुणींसह एका तरुणाचा समावेश आहे.

साम टिव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, परळ ब्रिजवर दामोदर हॉल समोर सकाळी 6.15 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. बाईकवरुन दोन तरुणी आणि एक तरुण प्रवास करत होते. साउथ बॉण्डने प्रवास करत असताना डिव्हायडरला धडक बसून नॉर्थ बॉण्डने जाणाऱ्या ट्रकवर बाईक जाऊन धडकली. ट्रक चालकाने स्वत:पोलीस स्टेशनमध्ये जाऊन अपघाताची सविस्तर माहिती दिली.

अपघातानंतर बाईकच्या समोर भागाचा अक्षरश: चक्काचूर झाला तर ट्रकचे देखील नुकसान झालं आहे. दुर्घटनेत बाईकवरील तिघे रस्त्यावर पडल्याने त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. अपघातानंतर तिघांना KEM हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आलं होतं. मात्र डॉक्टरांनी तिघांनाही मृत घोषित केलं. मृत झालेल्या दोघांची तनिष पतंगे (वय 24), रेणुका ताम्रकर ( वय 25 वर्ष) अशी नावे असून अद्याप एकाची ओळख पटलेली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gaurav Nayakwadi : भावी मुख्यमंत्री पराजित होणार....गौरव नायकवडी यांची जयंत पाटील यांच्यावर नाव न घेता टीका

Raj Thackeray: 17 तारखेला शिवाजी पार्कवर राज ठाकरेंची तोफ धडाडणार नाही, ठाकरेंनीच सांगितले सभा रद्द होण्याचे 'हे' कारण

Latest Maharashtra News Updates : पुण्यातील हडपसरमध्ये इमारतीला भीषण आग

Winter Skincare: हिवाळ्यात त्वचा सतत कोरडी आणि निस्तेज वाटते? मग हे ६ उपाय वापरून घेऊ शकता तुमच्या त्वचेची काळजी

Instagram Reels: इंस्टाग्राम रील्सवर 1 मिलियन व्ह्यूजसाठी किती पैसे मिळतात? रक्कम जाणून तुम्हीही व्हाल थक्क

SCROLL FOR NEXT