मुंबई

विमानाच्या धडकेत ३६ फ्लेमिंगो ठार! मुंबईतील अनेक भागात आढळले मृत पक्षी

मुंबईच्या घाटकोपर येथे एमिरेट्सच्या एका फ्लाइट (Emirates flight) शी धडकल्याने कमीत कमी ३६ फ्लेमिंगो ठार झाल्याचा प्रकार समोर आला आहे.

रोहित कणसे

मुंबईच्या घाटकोपर येथे एमिरेट्सच्या एका फ्लाइट (Emirates flight) शी धडकल्याने कमीत कमी ३६ फ्लेमिंगो ठार झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे विमानाचे देखील नुकसान झाले आहे.

रेस्किंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेलफेयर (आरएडब्लूडब्लू) चे संस्थापक आणि वन विभागाचे मानद वन्यजीव वार्डन पवन शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, घाटकोपरमध्ये अनेक ठिकणी मृत पक्षी आढळून आल्याचे फोन येत होते. तसेच पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की पक्षांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी या पक्ष्यांना पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहे.

मुंबईकडे येत असलेल्या अमिरेट्स फ्लाइटची धडक लागल्याने ३६ फ्लेमिंगो मृत्यूमुखी पडले आहेत. ही घटना सोमवारी रात्री घडल्याचे सांगितले जात आहे. हा अपघात झाल्यानंतर फ्लेमिंगो घाटकोपरच्या वेगवेगळ्या भागात आढळून आले. तसेच या धडकेने विमानाचे देखील नुकसान झाल्याचे सांगितले जात आहे. असे असूनही विमानाची विमानतळावर सुरक्षीतपणे लँडिंग करण्यात आली. सध्या विमानातील सर्व प्रवाशी सुरक्षित असल्याचे सांगितले जाते आहे. वन अधिकारी आणि अॅनिमल अॅक्टिव्हीस्ट यांनी मेलेल्या फ्लेमिंगो पक्षांची विल्हेवाट लावली.

या अपघाताचे अनेक व्हिडीओ देखील समोर आले आहेत. सांगितले जात आहे की मृत फ्लेमिंगो मुंबईच्या अनेक वेगवेगळ्या भागातून सापडले आहेत. स्थानिक लोकांनी फोन करून याबद्दल माहिती दिली, त्यानंतर वन विभाग आणि इतरांना घटनास्थळी पोहचून फ्लेमिंगोना ताब्यात घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT