वाशी : मुंबईबरोबरच नवी मुंबईही कोरोनाचा हॉटस्पॉट ठरत आहे. नवी मुंबईत सोमवारी (ता. 22) दिवसभरात 120 नवे रुग्ण सापडल्याने चिंता वाढली आहे. सध्या शहरातील बाधितांचा आकडा 4 हजार 961 वर पोहोचला आहे. तर, आत्तापर्यंत 168 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
महत्वाची बातमी : ठाकरे सरकारकडून चीनला धक्का, 'ते' तीन करार केले रद्द
नवी मुंबईतही कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. नवी मुंबईत सोमवारी 120 रुग्ण आढळले आहे. नेरूळ, तुर्भे, कोपरखैरणे आणि ऐरोली हे तर कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत आहेत. या चार भागांत मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळले आहेत. रुग्णांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण मिळवणे हे आरोग्य यंत्रणेसमोर आव्हान आहे.
महत्वाची बातमी : आता केवळ १ हजार ते ३ हजार रुपयांत मिळणार भाड्याचं घर...
दिवसभरात 62 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून एकूण 2 हजार 850 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. सध्या 1 हजार 943 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
4 area in navi mumbai become a Corona's hotspot
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.