47 year old professor arrested for sexually assaulting woman passenger Delhi-Mumbai IndiGo flight sakal
मुंबई

Mumbai Crime : दिल्ली-मुंबई इंडिगो फ्लाईटमध्ये प्रवासी महिलेशी लैंगिक अत्याचार प्रकरणी 47 वर्षीय प्राध्यापकाला अटक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : दिल्ली-मुंबई इंडिगो फ्लाईटमध्ये प्रवासी महिलेशी लैंगिक अत्याचार प्रकरणी 47 वर्षीय प्राध्यापकाला सहार पोलिसांनी अटक केली आहे.आरोपी प्राध्यापक रोहित श्रीवास्तव मूळचे पाटणाचे रहिवासी आहे. आरोपीला सध्या न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

सहार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी पहाटे 5.30 च्या सुमारास दिल्लीहून निघालेल्या फ्लाइटमध्ये श्रीवास्तव प्रवास करत होते. आरोपी आणि पिडीत डॉक्टर महिला विमानात एकमेकांच्या शेजारी बसले होते.फ्लाइट लँड होण्यापूर्वी प्रवासादरम्यान आरोपी श्रीवास्तवने महीलेला हेतुपुरस्सर अनुचितपणे स्पर्श केला.

यावरून दोन्ही सहप्रवाशांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. वाद थांबवण्यासाठी क्रू मेंबरला हस्तक्षेप करावा लागला. विमान उतरल्यानंतर अधिकाऱ्यांनी दोन्ही प्रवाशांना सहार पोलिस ठाण्यात नेले. पिडीत महिलेचा जवाब नोंदवला गेला.नंतर आरोपी श्रीवास्तववर गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्यांनतर श्रीवास्तव यांना अटक करण्यात आली,. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता त्यांला न्यायलयाने न्यायालयीन कोठडी सुनावली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT