मुंबई : एकीकडे जगभरात कोरोनाची साथ वेगाने फैलावत असतानाही अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी जीव धोक्यात घालून काम करत आहे. मात्र सुरक्षेची खबरदारी घेतल्यावरही त्यांना कोरोनाची लागण होण्याच्या अनेक बातम्या समोर येत आहे. अशाच प्रकारे चीनला कार्गो विमान घेऊन गेलेल्या एअर इंडियाच्या पाच पायलटना कोरोनाची लागण झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. हे सर्व पायलट गुआंगझाओला गेलेल्या विमानावर नियुक्त केले होते, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मोठी बातमी ः नवे आयुक्त ऍक्शनमध्ये ! कोरोनाला थोपवण्यासाठी 'मायक्रो प्लॅनिंग', प्रशासनाला महत्वाचे आदेश
लॉकडाऊन सुरु झाल्यापासून एअर इंडिया विविध देशात कार्गो उड्डाणे करीत आहेत. त्यापैकीच एक विमान गुआंगझाओ येथे वैद्यकीय साहित्य आणण्यासाठी 18 एप्रिलला येथे गेले होते. एअर इंडियाची कार्गो विमाने शांघाय तसेच हाँगकाँगलाही जात आहेत. याबाबत एअर इंडियाने अजून कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. पाच पायलट्सना कोरोना झाल्याची बातमी समजल्यापासून काही पायलटना आपली चिंता वाटत आहे. 'वंदे भारत' मिशन अंतर्गत अनेक विमाने परदेशात जात आहेत. कोरोना रुग्णांचे प्रमाण असलेल्या न्यूयॉर्कलाही जावे लागत आहेत. तिथे त्यांना ब्रेक घ्यावा लागत आहे, याकडेही काहींनी लक्ष वेधले.
मोठी बातमी ः Lockdown : मुंबईत 'सीआरपीएफ'ची पथके दाखल होणार?
'वंदे भारत मिशन'अंतर्गत सेवा करीत असलेल्या विमान कर्मचाऱ्यांची प्रवास सुरु करण्यापूर्वी तसेच प्रवास करण्यापूर्वी चाचणी होते. प्रवासानंतर त्यांना थेट हॉटेलमध्ये नेण्यात येते. अहवाल येईपर्यंत त्यांची व्यवस्था हॉटेलमध्येच होते. चाचणी निगेटिव्ह आल्यास त्यांना घरी नेण्यात येते; पण कोणाबरोबरही संपर्क न ठेवण्याची सूचना असते. पाच दिवसांनी पुन्हा चाचणी होते. ती निगेटीव्ह आली तसेच कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्यास ते कामावर रुजू होतात. कामावरील कोरोना चाचणी पाच दिवस अगोदर होत असते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.