Mumbai News- मुंबईच्या मिरा रोड परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. जैव-गॅस प्रकल्पाचा खड्ड्यात पडून एका पाच वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी काश्मिरा पोलीस स्टेशनमध्ये आयपीसीच्या सेक्शन ३०४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निष्काळजीपणामुळे मृत्यू झाल्याचं या आयपीसीच्या सेक्शनमध्ये म्हणण्यात आलं आहे.
माहितीनुसार, मुलाचे नाव श्रेयश मोनू सोनी असं होते. तो ज्युनियर केजीमध्ये शिकत होता. तो शुक्रवारी दुपारी चार वाजता खेळल्यासाठी गेला होता, पण तो परत आला नाही. आईला श्रेयस सापडला नाही, तेव्हा तिला संशय आला. जिजामाता उद्यान गार्डनजवळ असलेल्या एका खड्यात तो पडल्याचं आईच्या निदर्शनास आलं. हा बंद खड्डा जैव-गॅस प्रकल्पाचा होता. पण, त्याचे झाकण उघडे होते.
मिरा भाईंदर महापालिकेच्या (MBMC) अंतर्गत हा प्रकल्प येतो. खड्ड्यामध्ये पाणी साजले होते. पोलीस आणि अग्निशमन दलाच्या मदतीने श्रेयशला खड्ड्यातून बाहेर काढण्यात आले आणि पंडित भीमसेन जोशी हॉस्पिटलमध्ये त्याला दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी चिमुकल्याला मृत घोषित केलं. सदर घटनेमुळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. महापालिकेचा निष्काळपणामुळे चिमुकल्याचा मृत्यू झाल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे.
श्रेयसचे वडील मोनू सोनी ( वय ३४) यांनी सांगितलं की, त्यांची पत्नीने पूजाने आपला मुलगा हरवला असल्याची माहिती फोनवर दिली होती. त्यानंतर दादरमध्ये पाणपट्टी चालवणारे मोनू सोनी तात्काळ दुकान बंद करून मिरा रोड परिसरातील घरी परतले. लोकलमध्ये असतानाच श्रेयस जैव-गॅस प्रकल्पाचा खड्ड्यात पडल्याचं पत्नीने मला सांगितलं
मोनू सोनी यांनी मिरा-भाईंदर महापालिकेला श्रेयसच्या मृत्यूसाठी कारणीभूत धरलं आहे. त्यांनी काश्मिरा पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. जैव-गॅस प्रकल्प बंद करण्यात आला होता, पण त्याचे झाकण उघडेच ठेवण्यात आले होते. त्यामुळेच ही दुर्घटना घडली. याप्रकरणी दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी श्रेयसच्या वडिलांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.