मुंबई

मंगळवारी रात्री त्यांची कोरोना विरोधातली झुंज अपयशी ठरली आणि आणखी एका पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू

सकाळवृत्तसेवा

मुंबई - कोरोनाच्या संकटात अहोरात्र झटणाऱ्या पोलिसांमध्ये या विषाणूचा संसर्ग झपाट्याने होत असून, राज्यात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा आता एक हजारांवर गेला असताना गेला गेला आहे. मंगळवारी  मुंबईच्या शिवडी पोलिस ठाण्यातील एका 55 वर्षीय सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मुरलीधर शंकर वाघमारे यांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे राज्यात 8 पोलिस कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला आहे. त्यात मुंबईत 5 तर पुणे, सोलापूर आणि नाशिक येथील एक-एक पोलिस कर्मचारीचा समावेश आहे.

काही दिवसांपूर्वी त्यांच्यात कोरोनाची लक्षण आढळल्याने त्यांनी तपासणी केली. त्यावेळी त्यांना कोरोनाची  लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यांच्यावर नवीमुंबईतील महानगर पालिकेत उपचार सुरू होते. मात्र मंगळवारी रात्री त्यांची कोरोना विरोधातली झुंज अपयशी ठरली. 

मुंबई पोलिस दलात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत दिवसेंदिवस वाढत आहे. आतापर्यंत मुंबईतील 403 पोलिसांना कोरोनाची बाधा झाल्याची धक्कादायक माहिती आहे. मात्र  पोलिसांमध्ये कोरोनाचा हा प्रादुर्भाव फक्त आणि फक्त काही बेजबाबदार नागरिकांमुळे वाढत आहे.

लॉकडाउनबाबत लोक आज ही गांभीर दिसत नाही. बाजारात गर्दी करणे, विनाकारण घराबाहेर पडणे, सुरक्षित वावरचा विसर असे प्रकार सर्वच ठिकाणी घडत आहेत. नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचे काम मात्र पोलिसांना करावे लागत आहे. नियम मोडणाऱ्यांची चौकशी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणे, कागदपत्रे बनविणे अशी कामे करताना पोलिसांचा त्यांच्याशी थेट संपर्क येतो. 

यामुळे पोलिसांना करोनाची लागण झपाट्याने होत आहे. राज्यात 1007 वर  पोलिसांना करोनाची लागण झाली असून, आतापर्यंत आठ पोलिसांचा मृत्यू झाला आहे. 1007 पोलिसांमध्ये 106 अधिकारी आणि 901 कर्मचारी यांचा समावेश आहे. शेकडो पोलिसांमध्ये करोनासदृश लक्षणे दिसत असून, राज्यभरात सुमारे तीन हजार पोलिसांचे विलगीकरण करण्यात आले आहे. त्यामुळेच मुंबई पोलिस दलातील अस्वस्थता दूर करण्यासाठी स्वत: पोलिस आयुक्त रस्त्यावर उतरून कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करत आहे.  

केंद्रीय पथकांनी मुंबई-पुणे इथं भेटी दिल्या असून उपयुक्त सूचना केल्या आहेत. इथे डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस अहोरात्र काम करीत आहेत. विशेषत: पोलिसांना मधूनमधून विश्रांती देण्याची गरज आहे. त्यांच्याकडे कायदा व सुव्यवस्थेचं काम आहे, ते आजारी पडून चालणार नाही. त्यामुळे आवश्यकता भासेल तसं केंद्र सरकारने त्यांचं मनुष्यबळ उपलब्ध करून दिल्यास पोलिसांवरचा ताण कमी होईल. त्याचप्रमाणे केंद्रीय संस्था, पोर्ट ट्रस्ट, लष्कराची रुग्णालये व आयसीयू बेड्स सुविधाही मिळाल्यास पुढे कोरोनाशी लढताना त्याचा उपयोग होईल, असे यापूर्वीच  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्पष्ट केले होते. त्यामुळे मुंबई पोलिसांना मदत म्हणून लवकरच नव्या दमाचे राज्य राखीव राखीव पोलीस दलाच्या 5 ते 10 प्लाटून येण्याची शक्यता आहे.

55 years old mumbai cop lost his life while fighing against corona read full news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT