Mumbai: कोरोनाची तिसरी लाट (corona third wave) आणि ओमिक्रॉनचा (omicron variant) वाढता प्रभाव पाहता मुंबईतील (corona in mumbai) चिंता सध्या वाढली आहे. मुंबईतील 60 बेस्ट कर्मचाऱ्यांना (Best Employees) कोरोनाची लागण (Corona Positive) झाली आहे. लागण झालेल्या रुग्णांमध्ये काही चालकांचाही समावेश असल्यामुळे चिंता वाढली आहे. बेस्ट पीआरओनं (Best PRO) याबद्दलची माहिती आहे. (60 employees of BEST including bus drivers test positive for COVID-19)
अलीकडच्या काही दिवसांमध्ये देशात आणि राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. खासकरून मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार वेगाने होत आहे. याच दरम्यान मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असलेल्या बेस्टमधील तब्बल 60 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. लागण झालेल्या कर्मचाऱ्यांमध्ये काही चालकांचाही समावेश आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.
देशात डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांमध्ये वाढ दिसत आहे. भारतात सोमवारी दिवसभरात ३७ हजार ३७९ नवे रुग्ण आढळले. तर ११ हजार ७ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. दिलासा देणारी बाब म्हणजे मृतांचा आकडा कमी आहे. गेल्या २४ तासात देशात १२४ जणांनी कोरोमनामुळे प्राण गमावले. सध्या दैनंदिन पॉझिटिव्हीटी रेट हा ३.२४ टक्के इतका आहे.
देशातील सक्रीय रुग्णांची संख्या १ लाख ७१ हजार ८३० इतकी झाली आहे. तर आतापर्यंत एकूण ३ कोटी ४३ लाख ६ हजार ४१४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशात कोरोनामुळे आजपर्यंत ४ लाख ८२ हजार १७ जणांचा मृत्यू झाला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.