66th Mahaparinirvan Day B R Ambedkar Greetings from a politician Dr Babasaheb Ambedkar remain immortal mumbai Esakal
मुंबई

66th Mahaparinirvan Day : बाबासाहेब अमर रहें! मुख्यमंत्र्यांसह अनेक राजकारण्याकडून अभिवादन

राज्यपाल, मुख्यमंत्री, उप मुख्यमंत्री, मंत्री, सर्वपक्षीय नेते यांचे अभिवादन; चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी ६ डिसेंबर रोजी दादर चैत्यभूमीवर लाखो अनुयायांचा 'निळा सागर' लोटला होता. "गेला माणुसकी भीम दाऊन,पाणी चवदार तळ्याचे चाखून", अशा ओळी गात"डॉ. बाबासाहेब आंबेडकर अमर रहे", अशा घोषणा देत लाखो अनुयायी यांनी दादर, चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसर दणाणून सोडला.

महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे यंदाही पुष्पवृष्टी करण्यात आली. तर मुंबई महापालिकेने सुरक्षिततेच्या दृष्टीने यंदा प्रथमच ' ड्रोन' चा वापर केला. यावेळी, राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर आदी सर्वपक्षीय नेते मंडळी यांनी उपस्थिती दर्शवून चैत्यभूमी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत त्यांना पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

राजकीय नेत्यांकडून अभिवादन :

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने त्यांना अभिवादन करण्यासाठी सर्वपक्षीय नेते व लोकप्रतिनिधी आदींनी उपस्थिती दर्शवली. यामध्ये, शिक्षण मंत्री व पालकमंत्री दीपक केसरकर, महिला व बालकल्याण मंत्री आणि पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री अब्दुल सत्तार, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते व माजी मंत्री, आमदार आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, आमदार जितेंद्र आव्हाड, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मंत्री व नेते बाळासाहेब थोरात, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, माजी मंत्री वर्षा गायकवाड, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेब ठाकरे गटाचे खा.राहुल शेवाळे, खा.श्रीकांत शिंदे, भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार, माजी खासदार किरीट सोमय्या, समाजवादी पक्षाचे नेते व आमदार अबू असीम आझमी आदींचा यामध्ये समावेश आहे.

चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी

मुंबई महापालिका, राज्य शासन व पोलीस यांच्या समन्वयाने सालाबादप्रमाणे यंदाही चैत्यभूमीवर हेलिकॉप्टरद्वारे सायंकाळी ४.१७ वाजल्यापासून चार वेळा पुष्पवृष्टी करण्यात आली.

अनुयायी यांच्यासाठी मोफत अल्पोपहार

यावेळी, दादर रेल्वे स्थानकापासून ते शिवाजी पार्क परिसरात बेस्ट उपक्रम, राजकीय नेते, सामाजिक संस्था, आंबेडकरी संस्था आदींनी देशभरातून आलेल्या अनुयायी यांच्यासाठी सकाळपासूनच चहा, नाश्ता, जेवण, पाणी, बिस्कीट, खाद्यपदार्थ आदींची व्यवस्था केली होती.

मुंबई महापालिकेने सालाबादप्रमाणे यंदाही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने विविध सेवासुविधा पुरवून संपूर्ण जबाबदारी पार पाडली. तसेच, महापालिकेच्या जोडीला मध्य व पश्चिम रेल्वे प्रशासन, बेस्ट उपक्रम, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य विभाग, घनकचरा, मलनि:सारण विभाग, वाहतूक पोलीस विभाग आदींनीही पुढाकार घेत आपापली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. यावेळी, मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा आदी संबंधित अधिकारीं आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्वय समितीचे सेक्रेटरी नागसेन कांबळे आदींनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना पुष्पचक्र अर्पण करुन अभिवादन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: शरदचंद्र पवार पक्षाचे विजयी उमेदवार अभिजीत पाटील यांनी जीपवर चढून दंड थोपटत विजय साजरा केला

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT