8 Bangladesh Women Arrested In Mumbai With Fake Documents Esakal
मुंबई

Bangladeshi Women Mumbai: कागदपत्रे तर बनावट होतीच पण... बांगलादेशी पॉर्नस्टारला उल्हासनगरमधून अटक

सकाळ वृत्तसेवा

डोंबिवली: भारतात बेकायदा घुसखोरी करून वास्तव्य करणाऱ्या बांग्लादेशी नागरिकांचा प्रश्न कायम असताना त्यावर ठोस उपाययोजना सरकार करू शकलेले नाही. कल्याण येथून गुन्हेगारी वृत्तीच्या बांग्लादेशीना काही दिवसांपूर्वीच अटक करण्यात आली होती. त्यातच आता उल्हासनगर येथून एका पॉर्न स्टारला हिललाईन पोलिसांनी अटक केली आहे.

रिया बर्डे असे तिचे नाव आहे. रियासह तिचे कुटुंब भारतात बेकायदेशीर वास्तव्य करत असल्याची बाब उघड झाली आहे.

पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार, पॉर्नस्टार रिया बर्डे हिला आरोही बर्डे आणि बन्ना शेख या नावानेही ओळखले जाते. उल्हासनगरमध्ये ती रिया बर्डे उर्फ आरोही बर्डे या मराठी नावाने राहात होती. हिललाईन पोलिसांनी तिला बनावट कागदपत्रांच्या आधारे भारतात वास्तव्य केल्याच्या आरोपांखाली अटक केली आहे. रिया, तिची आई, तिचा भाऊ आणि तिची बहीण अशा सगळ्यांनीच खोट्या कागदपत्रांच्या मदतीने भारतीय नागरिकत्व मिळवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

रियाची आई अंजली ही बांगलादेशची रहिवासी आहे आणि ती तिच्या दोन मुली आणि मुलासह भारतात बेकायदेशीरपणे राहत होती. रियाच्या आईने पश्चिम बंगालचा असल्याचे सांगून अमरावती येथील रहिवासी अरविंद बर्डे यांच्याशी लग्न केले. तिने नंतर तिची भारतीय ओळख सिद्ध करण्यासाठी स्वतःसाठी आणि मुलांसाठी बनावट जन्म प्रमाणपत्रे आणि इतर कागदपत्रे सादर करून भारतीय पासपोर्ट मिळवला. दरम्यान रियाला यापूर्वी वेश्याव्यवसायाशी संबंधित एका प्रकरणात अनैतिक वाहतूक (प्रतिबंध) कायद्यांतर्गत अटक करण्यात आली होती.

मित्रामुळे पितळ उघडे

रियाच्याच एका मित्रामुळे त्यांचं सगळं पितळ उघडं पडलं. प्रशांत मिश्रा नावाचा रियाचा मित्र या सगळ्यासाठी कारणीभूत ठरला. प्रशांत मिश्राला अचानक एक दिवशी रिया बांगलादेशची रहिवासी असून भारतात बैकायदेशीररीत्या राहात असल्याचं समजलं. त्यानंतर त्यानं पोलिसांत तक्रार केली व पोलिसांनी लागलीच रियाची कागदपत्रं तपासून कारवाई सुरू केली आहे.

पोलिसांनी रियाशिवाय तिची आई अंजली बर्डे उर्फ ​​रुबी शेख, वडील अरविंद बर्डे, भाऊ रवींद्र, उर्फ ​​रियाज शेख आणि बहीण रितू उर्फ ​​मोनी शेख यांनाही आरोपी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्नाटकात उर्दू भाषा अनिवार्य! वादग्रस्त निर्णयामुळे राजकीय वातावरण तापले

Kamindu Mendis ची लै भारी कामगिरी! रोहित, विराट यांनाही 'हे' नाही जमलं, पठ्ठ्याची थेट ब्रॅडमन यांच्याशी बरोबरी

Shardiya Navratri 2024: नवरात्रीमध्ये अखंड दिवा लावताय? मग जाणून घ्या नियम, आयुष्यात मिळेल यश

George Munsey : T10 सामन्यात फलंदाजाचे वादळी शतक; १० चौकार अन् ६ षटकारांची आतषबाजी, मोडला भारतीयाचा विक्रम Video

Latest Maharashtra News Updates: हायकोर्टात पोहचले चायनीज लसणाचे प्रकरण

SCROLL FOR NEXT