मुंबई

मुंबईत टॅक्‍सीने प्रवास करताय ? सावधान ! तुमच्या जीवाला आहे धोका..

प्रशांत कांबळे

मुंबई : परिवहन विभागाने वाहनांच्या संबंधीत सर्व सुविधा आणि सेवा ऑनलाईन केल्यानंतर बेशिस्त वाहनांची माहिती मिळवणे सोपे झाले आहे. परिवहन विभागाच्या अधिकृत एम परिवहन ऍपच्या माध्यमातून सकाळने मुंबईतील विविध ठिकाणांवर केलेल्या सर्व्हेनूसार मुंबई उपनगरातील 80 टक्के टॅक्‍सी चालकांकडून नियमांचा भंग केल्या जात असल्याचे उघड झाले आहे. त्यामूळे त्यामुळे सातत्याने मुंबईतील टॅक्सी प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. 

प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्‍सीचा अपघात झाल्यास त्यासाठी वाहनाचा विमा आवश्‍यक असतो. प्रदुषणाच्या दृष्टीने PUC करणं आवश्‍यक आहे. तर दर दोन वर्षानंतर वाहनांची फिटनेस तपासणी करणे अनिवार्य आहे. टॅक्‍स वैधता सुद्धा महत्त्वाची आहे.

सकाळने परिवहन विभागाच्या अधिकृत एम परिवहन ऍपच्या माध्यमातून प्रवासी वाहतूक करणाऱ्या टॅक्‍सीची मुंबईच्या विविध भागात तपासणी केली. यातील प्रत्येक ठिकाणावरील दहा टॅक्‍सी तपासणीत आठ टॅक्‍सीमध्ये विमा, फिटनेस, टॅक्‍स, PUC यातील प्रत्येकी दोन प्रकाराची वैधता संपल्याचे दिसून आले आहे. त्यामूळे अशा वाहनांमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या जिवाला सुद्धा धोका निर्माण होतांना दिसून येत आहे. 

केंद्र रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन कायद्यात सुधारणा केली  आहे. त्याचा धाक अद्यापही राज्यातील प्रवासी वाहतूकदारांमध्ये दिसून येत नाही. त्यामूळे मुंबईतील टॅक्‍सीचालकांकडून सर्रास परिवहन विभागाच्या नियमांचा भंग करत असल्याचे दिसून येत आहे. 

पियुसीसी आणि वाहन विमा योजनेला नुकतेच ऑनलाईन करण्यात आले आहे. त्यामूळे जुने PUC आणि वाहन विमा नुतनीकरणासाठी जो पर्यंत येणार नाही. तोपर्यंत ऑऩलाईन दिसणार नाही. त्याशिवाय पियुसीसी, विमा, फिटणेस, टॅक्‍स वाहन चालकांना आवश्‍यक आहे. हे नसल्यास परिवहन विभागाच्या भरारी पथकाकडून नियमीत कारवाई केली जाते. 

- शेखर चन्ने, परिवहन आयुक्त

काय आहे दंडाची तरतूद 

  • वाहनाचा विमा काढलेला नसल्यास वाहन अटकाव आणि वाहन चालकाला 600 रुपये दंड 
  • पियुसीसी वैधता संपली असल्यास, चालक-मालकाला प्रत्येकी 500 रूपये दंड 
  • वाहनाची फिटनेस वैधता संपली असल्यास चालक-मालकाला प्रत्येकी 1000 रूपये दंड आणि गाडी अटकाव 
  • वाहनाचा रोड टॅक्‍स वैधता संपली असल्यास गाडी अटकाव आणि टॅक्‍सवर दोन टक्के व्याजाचा दंड 
  • परमिट वैधता संपली असल्यास गाडी अटकाव आणि न्यायालयात प्रकरण दाखल केल्या जाते.  

WebTitle : 80 percent taxi drivers do not follow safety and mandatory rules and regulations  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्यासाठी निघाले

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

सोलापूर जिल्ह्यातील ११ आमदारांनी किती घेतली मते? दुसऱ्या- तिसऱ्या क्रमांकावर कोण? जाणून घ्या, जिल्ह्यातील विजयी अन्‌ दुसऱ्या-तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवारांची मते

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

SCROLL FOR NEXT