Mumbai-Pune Expressway Esakal
मुंबई

Mumbai Pune Expressway: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील 2 तासांचा ब्लॉक ४० मिनिटातच आटोपला; वाहतूक पुन्हा सुरू

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून प्रवास करणाऱ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. आज मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरती ग्रँटी बसवण्याच्या कामासाठी आज दोन तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात आला होता. त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात आलेली होती. प्रशासनाने हे काम लवकर आटोपल्याने दोन तासांचा ब्लॉक अवघ्या ४० मिनिटातच संपला आहे. त्यामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक आता पूर्ववत झाली आहे.

आज दुपारी १२ ते २ वाजण्याच्या दरम्यान वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार होती, याबाबतची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून देण्यात आलेली होती. त्यामुळे आज दुपारी १२ ते २ वाजण्याच्या दरम्यान या मार्गावरती प्रवास करणाऱ्यांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं सांगण्यात आलं होतं.

मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरील लोणावळ्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावरती आज ग्रँटी बसवण्याचे काम करण्यात आले आहे. या कामासाठी दुपारी १२ ते २ वाजेच्या वेळेत पुण्याच्या दिशेने जाणारी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय एमएसआरडीसीने घेतला होता.

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हीच गोष्ट लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून आज ओव्हरहेड गॅन्ट्री बसवली आहेत. याच गॅन्ट्रीवर पुढच्या काळात सीसीटीव्ही बसवले जाणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prithviraj Chavan : लाडक्‍या बहिणींची महायुतीकडून फसवणूक...पृथ्‍वीराज चव्‍हाण; खडखडाटामुळे योजना बंद

Archery World Cup Final भारताच्या दीपिका कुमारीला 'रौप्य' यश; जिंकलं स्पर्धेतील सहावं मेडल

1990 च्या दशकात बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वात कोकणात शिवसेनेचं भगवं वादळ धडकलं अन् राजापुरात फडकवला यशाचा झेंडा

Uddhav Thackeray: ठाण्यातील 'या' 11 विधानसभा मतदारसंघांवर ठाकरे गटाचा दावा, निष्ठावंतांना मिळणार संधी

Women’s Health : शारीरिक संबंधानंतर योनीमार्गात होतो स्त्राव अन् प्रचंड वेदना, ही असू शकतात कारणं

SCROLL FOR NEXT