raigad sakal
मुंबई

Raigad News : छत्रपती शिवाजी महाराजांचा २५ फुटी पुतळा उभारणार

खासदार सुनील तटकरे यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

रोहा : शहरात छत्रपती शिवाजी महाराजांचा २५ फूट उंचीचा पुतळा उभारणार असून पाच दिवसांत चौथऱ्याच्या कामाला सुरुवात होईल तर २५ फेब्रुवारीपर्यंत पुतळा उभारणीचा काम पूर्ण होईल, अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली. रोहा शासकीय विश्रामगृहात शनिवारी नुकत्‍याच आयोजित बैठकीत ते बोलत होते.

राज्‍य सरकारमध्ये सहभागी झाल्‍यामुळे श्रीवर्धनमध्ये विकासकामांना चालना मिळाली असून पुरवणी अर्थ संकल्पात रस्ते विकासासाठी १२० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. जामगावातील प्रस्ताविक डॉ. सी. डी. देशमुख वन उद्यानाच्या कामासाठी २२ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे धाटाव एमआयडीसीलगत असलेल्या धाटाव, महादेववाडी, वाशी, लांढर, तळाघर, कारिवणे इत्यादी ग्रामीण भागातील रस्ते काँक्रिटीकरणाच्या कामासाठी साडे सतरा कोटींचा निधी लवकर उपलब्‍ध होणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले.

वाकण, रोहा, खारी, तांबडी, घोसाळे, खाजणी, मांदाडमार्गे म्हसळा रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून २५० कोटींचा निधी खर्च अपेक्षित आहे. एमआयडीसी व मुख्य रस्त्यावरील अपघातात रोखण्यासाठी व कामगारांची गैरसोय दूर करण्यासाठी रोहा ते किल्ला, किल्ला ते आंबेवाडी नाका, अशोकनगर ते भुवनेश्वर रस्त्यावरील पथदीप लावण्यासाठीही निधी मंजूर करण्यात आला आहे.

- खासदार सुनील तटकरे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: संविधान नसतं तर..? राहुल गांधींनी फुले आंबेडकरांची आठवण काढत केली RSS वर टीका

0.05 सेकंद, 2 सेंटीमीटर... Trump यांच्यावर गोळीबार; अमेरिकेच्या निवडणुकीचा टर्निंग पॉइंट कसा ठरला?

Supreme Court : तुमच्याकडे कारचे ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर... सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; अनेकांना होणार फायदा

लग्नाच्या १३ वर्षांनंतरही मुल का नाही? सतत एकच प्रश्न विचारणाऱ्यांना प्रिया बापटचं रोखठोक उत्तर, म्हणाली- मी आता..

'या' दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला! कांटे की टक्कर अन् काटाजोड लढती; कोल्हापुरातील 'या' दहा मतदारसंघांत काय स्थिती?

SCROLL FOR NEXT