मुंबई : अहमदाबाद दरम्यान चालवण्यात येणाऱ्या बुलेट ट्रेन प्रकल्पात विरार आणि नालासोपारा दरम्यान येथे एक स्थानक उभारण्यात येणार आहे. या स्थानकाचा आणि स्थानक परिसराचा विकास तीन टप्प्यात कशा पद्धतीने होणार याबाबतची माहिती जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जायका) कंपनीतील अधिकाऱ्यांनी नुकतीच वसईत आयोजित एका कार्यशाळेत दिली. वसई विरार महानगरपालिकेतर्फे या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
वसई तालुक्यातून मुंबई - अहमदाबाद हायस्पीड रेल्वे म्हणजेच बुलेट ट्रेन जाणार आहे. या बुलेट ट्रेनसाठी राज्यातून एकूण ४ स्थानके आहे. त्यात बीकेसी, ठाणे, विरार आणि बोईसर यांचा समावेश आहे. हे स्थानक नालासोपारा पूर्वेच्या पेल्हार येथील वालईपाडा येथे तयार केले जाणार आहे. तसेच या स्थानक परिसराचा विकास देखील करण्यात येणार आहे. या विकास कामासाठी काही महिन्यांआधी गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने विशेष समिती स्थापन करत काम सुरु केले होते. तसेच जपान इंटरनॅशनल को-ऑपरेशन एजन्सी (जायका) या जपानच्या कंपनीतील अधिकारी देखील यासाठी काम करत होते. याच विकास योजनेची माहिती देण्यासाठी जायका कंपनीचे अधिकारी वसईत आले होते. वसई विरार महानगरपालिकेतर्फे या कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी वसई विरार महापालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार, ठाणे महापालिका आयुक्त, वसई विरार महापालिकेच्या नगररचना विभागाचे संचालक वाय एस रेड्डी, एमएमआरडीएचे अधिकारी , एनएचआरसीएल, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी जायका कंपनीच्या अधिकाऱ्यांतर्फे विरार येथील स्थानकाच्या परिसरात उभारण्यात येणाऱ्या नागरी वसाहती आणि व्यवसाय केंद्र विकास आराखडा सादर केला. या परिसराचा विकास हा टप्प्याटप्प्याने असे तीन टप्प्यात करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले. यामध्ये ५०० मीटर परिसरात , १ किमी परिसरात आणि २ किमी परिसरात काय असेल याबाबत माहिती दिली. तसेच या विकासामुळे नागरीकरण वाढण्याची शक्यता असून त्या अनुषंगाने नागरी सुविधांबाबतचा विकास आराखडा देखील सादर केला. यामध्ये रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, इमारती, रुग्णालये आणि इतर कामांचा समावेश होता. बुलेट ट्रेन बाबतची सद्यस्थिती काय असून ही प्रस्तावित स्थानके अंदाजे किती कालावधीत पूर्णत्वास येतील आणि त्या परिसरातील विकास कामे कधी पूर्णत्वास येतील याची माहिती आली. विशेष म्हणजे वसई विरार महानगरपालिकेचे आयुक्त अनिलकुमार पवार यांनी देखील कार्यशाळेत वसई विरार महानगरपालिकेची सखोल माहिती दिली. शहराची रचना, शहरात असलेली पर्यटन स्थळे, प्रभाग, समुद्र किनारे आणि इतर माहिती देखिल देण्यात आली.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.