Fake doctor  sakal
मुंबई

बोगस डॉक्टरने केल्या हजार शस्त्रक्रिया; 'असा' झाला पर्दाफाश

नरेश शेंडे

रुग्णांना झालेल्या रोगांवर योग्य उपचार करुन त्यांची व्याधींपासून सुखरुप सुटका करणारे अनेक डाॅक्टर्स प्रत्येक रुग्णासाठी देवदुतच असतात. मात्र,डाॅ.मुकेश कोटा (30) यांसारखे रुग्णांच्या जीवाचा खेळ करणारे बोगस डाॅक्टर (Fake Doctor) याला अपवाद आहेत.

मुंबई : रुग्णांना झालेल्या रोगांवर योग्य उपचार करुन त्यांची व्याधींपासून सुखरुप सुटका करणारे अनेक डाॅक्टर्स प्रत्येक रुग्णासाठी देवदुतच असतात. मात्र,डॅा.मुकेश कोटा (30) यांसारखे रुग्णांच्या जीवाचा खेळ करणारे बोगस डॅाक्टर (Fake Doctor) याला अपवाद आहेत. मुळव्याध्याने त्रस्त असलेल्या एका टॅक्सी ड्रायव्हरवर शस्त्रक्रिया (Surgery)करुन त्याचा जीव धोक्यात टाकणाऱ्या बोगस डाॅक्टरला मंगळवारी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police)बेड्या ठोकल्या ( Arrest)आहेत. त्याला न्यायलायाचे आदेशान्वये २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. खलीलुद्दीन खतीब (43) असं या टॅक्सी ड्रायव्हरचं नाव आहे. (A Fake Doctor Arrested done at least 1000 fake surgeries prison till 27th june)

एम.बी.बी.एसची अधिकृत पदवी असल्याशिवाय अशा शस्त्रक्रिया करता येत नाहीत.अशी महिती राज्य वैद्यकीय मंडळाचे (MMC)चेअरमन डाॅ.शिवकुमार उत्तुरे यांनी दिली आहे. तर आरोपी मुकेश कोटा याने आंध्रप्रदेश विद्यापीठातून एम.बी.बी.एसची पदवी २०१७ मध्ये प्राप्त केली असल्याचा दावा केला होता.त्याने मागील ३ वर्षांत कमीत कमी एक हजार रुग्णांवर अशा शस्त्रक्रिया केल्या असल्याचं कबुल केलं आहे.कोटा दादर येथे गोपाल्स राव्ज पाईल्स अॅंड अॅनो रेक्टल सेंटर नावाने क्लिनीक तीन वर्षांपासून चालवत होता.अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

दरम्यान,कोटाने सुरु केलेल्या क्लिनीकचा नंबर इंटरनेटवर उपलब्ध असल्याने २० फेब्रुवारीला आपण या क्लिनीकला भेट दिली.असं खलीलने पोलिसांना सांगितलं आहे. दुसऱ्या दिवशी शस्त्रक्रिया करावी लागेल असं कोटाने मला सांगितलं.या शस्त्रक्रियेसाठी मला एक संमतीपत्र असलेला फॅार्म भरण्यासाठीही सांगितलं.त्यानंतर कोटाने माझ्यावर शस्त्रक्रिया केली.यासाठी माझ्याकडून २५००० रुपये घेण्यात आले.

त्यानंतर खलील त्याच्या घरी परतत असताना टॅक्सीत त्याच्या शरीरातून रक्तस्त्राव होऊ लागल्याने तो बेशुद्धावस्थेत होता.त्यानंतर त्याला केईएण रुग्णालयात दाखल करण्यात आले.रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यावर त्याने ५ मार्चला झालेल्या प्रकरणी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली.जेजे रुग्णालयाच्या विशेष पथकानेही या प्रकरणाविषयी त्या बोगस डॅाक्टरने हलगर्जीपणा केला असल्याचं सांगितलं आहे.अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.याप्रकरणी आरोपी मुकेश कोटा याला पोलिसांनी अटक केली असून आयपीसीच्या सेक्शन ३३७,४१९,४२०अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.बुधवारी आरोपी कोटाला न्यायालयात हजार केले असता त्याला २७ जूनपर्यंत पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक नितीन मनसिंग बोबडे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: हा ऐतिहासिक विजय, जनतेचे आभार- शिंदे

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT