flyover connecting ulhasnagar to kalyan  sakal
मुंबई

Ulhasnagar News : उल्हासनगरातून उभारण्यात येणार कल्याण प्रेम ऑटोला जोडणारा उड्डाणपूल; ओमी कलानी यांची पत्रकार परिषदेत माहिती

Ulhasnagar News : वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी उल्हासनगरातून कल्याण प्रेम ऑटोला जोडणारा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.

दिनेश गोगी - सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर: वाहतूक कोंडीतून मार्ग काढण्यासाठी उल्हासनगरातून कल्याण प्रेम ऑटोला जोडणारा उड्डाणपूल उभारण्यात येणार आहे.त्यासाठी स्वर्गीय आमदार ज्योती कलानी यांनी केलेल्या मागणीची किंबहूना त्यांच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतल्याची माहिती ओमी कलानी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

उल्हासनगर मधून कल्याण येथील खडकपाडा येथे जाण्यासाठी शहाड रेल्वे स्थानक परिसरातील वाहतूक कोंडीतून मार्ग काढून उड्डाणपुलाचा वापर वाहनचालकांना करावा लागतो.विशेष म्हणजे अरुंद असलेल्या शहाड पुलावर नेहमीच वाहतूक कोंडी तथा खड्ड्यांचे साम्राज्य असल्याने वाहन चालकाना तारेवरची कसरत करावी लागते.गजबजलेल्या 17 सेक्शन वरून कल्याणच्या प्रेम ऑटोला जायला जवळपास अर्धा ते एक तास लागतो.

कारण कल्याणच्या रेल्वे पुलावर सतत ट्रॅफिकची समस्या निर्माण होते.ही वेळ वाचवण्यासाठी स्वर्गीय आमदार ज्योती कलानी यांनी 2017 मध्ये कल्याण बदलापूर मार्गावरील शांतीनगर येथून वालधूनी नदी वरून प्रेम ऑटोपर्यंत जाण्यासाठी उड्डाणपूलाची मागणी केली होती.

त्यानंतरच्या काळात पंचम कलानी ह्या महापौर झाल्या.भाजपच्या सत्तेचा वापर करीत आमदार ज्योती कलानी यांनी एमएमआरडीएमध्ये उड्डाणपुलाला तत्वतः मान्यता मिळवून दिली होती.मात्र नंतरच्या काळात आमदार कुमार आयलानी हे निवडून आले.आईचा ड्रीम प्रोजेक्ट असल्यामुळे ओमी कलानी यांनी खासदार मित्र डॉ.श्रीकांत शिंदे यांच्याकडे हा विषय लावून धरला होता.श्रीकांत शिंदे यांनी या पुलाची कल्याण,उल्हासनगर आणि विठ्ठलवाडी या तिन्ही शहरांना गरज असल्यामुळे एमएमआरडीएच्या माध्यमातून प्राकलन बनवले.

उड्डाणपूलाची निविदा प्रक्रिया संपली असून नाशिक येथील एका ठेकेदाराला हे काम मिळाले आहे.विधानसभा निवडणुकीच्या मेनूफेस्टो मध्ये या उड्डाणपूलाचा समावेश असून खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकाराने आई स्व.आमदार ज्योती कलानी यांच्या स्वप्नांची पूर्तता झाल्याचे ओमी कलानी यांनी सांगितले.यावेळी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षा पंचम कलानी,माजी नगरसेवक मनोज लासी,प्रवक्ते कमलेश निकम उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT