Latest Mumbai news: पनवेल तालुक्यातील वलप गावात राहणाऱ्या संगीता राजेंद्र आगवणे (४९) या महिलेची अज्ञात मारेकऱ्याने नाक, तोंड दाबून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. संगीता आगवणे यांच्या अंगावरील दागिने, मोबाईल फोन व पर्स लुटण्यासाठी त्यांची हत्या करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार पनवेल तालुका पोलिसांनी अज्ञात मारेकऱ्याविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.
या घटनेतील मृत संगीता आगवणे पनवेलमधील वलप गावात कुटुंबासह राहण्यास असून सोमवारी (ता. ७) सायंकाळी त्या नेहमीप्रमाणे खासगी शिकवणी घेण्यासाठी गावात गेल्या होत्या.
शिकवणी घेऊन त्या आपल्या घरी परतत असताना, घराजवळच्या कच्च्या रस्त्यावर अज्ञात मारेकऱ्याने संगीता आगवणे यांच्या अंगावरील दागिने, मोबाईल फोन व पर्स असा सुमारे दोन लाख रुपये किमतीचा ऐवज लुटला. या वेळी त्यांनी विरोध केल्याने मारेकऱ्याने त्यांचे नाक, तोंड दाबून त्यांची हत्या केल्यानंतर मृतदेह रस्त्यालगतच्या झुडपात टाकून पळ काढला.
दरम्यान, संगीता आगवणे या रात्री उशीरापर्यंत घरी न परतल्याने त्यांच्या मुलाने त्यांच्या मोबाईल फोनवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यांचा फोन बंद असल्याचे आढळून आल्यानंतर मुलाने त्यांचा शोध सुरू केला. दरम्यान, संगीता आगवणे घराच्या दिशेने येणाऱ्या कच्च्या रस्त्यालगतच्या झुडपात मृतावस्थेत आढळून आल्या. त्यामुळे त्यांच्या मुलाने त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले. यावेळी त्यांच्या अंगावरील दागिने, मोबाईल फोन व पर्स नसल्याचे आढळून आले.
संगीता आगवणे यांच्या अंगावर कुठलीही जखम अथवा खरचटल्याच्या खुणा नसल्याचे पोलिसांनी केलेल्या प्राथमिक तपासात आढळून आले आहे. त्यानंतर पोलिसांनी शवविच्छेदन केले असता, त्यांचे नाक, तोंड दाबल्यामुळे श्वास कोंडून त्यांचा मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनात आढळून आले. यावरून अज्ञात मारेकऱ्याने संगीता आगवणे यांच्या अंगावरील दागिने लुटण्यासाठी त्यांची हत्या केल्याचे आढळून आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.