Aaditya-Thackeray-Sad 
मुंबई

"...म्हणून तर आदित्य ठाकरेंना कोरोना झाला नाही ना?"

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकांचे पडघम आता वाजू लागले आहेत. अवघ्या काही महिन्यांवर असलेल्या निवडणुकांसाठी प्रत्येक पक्ष आपापल्या परीने रणनिती आखताना दिसत आहे. त्यातच काँग्रेसने मंगळवारी पालिका प्रशासन आणि सत्ताधारी शिवसेना यांच्यावर मोठ्या रकमेच्या घोटाळ्याचा आरोप केला. मुंबई महापालिका प्रशासनाने मालमत्ता करात ८०० कोटींचा गैरव्यवहार केला असून यास सत्ताधारी शिवसेनाच जबाबदार असल्याचं काँग्रेसने म्हटलं. "मालमत्ता कराच्या वसुलीबाबत पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी एकट्या वरळीत सुमारे १०० कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे", असा आरोप विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी केला. यावरून भाजपचे अतुल भातखळकर यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना चांगलाच टोला लगावला.

"वरळी येथील मालमत्तेचे क्षेत्रफळ एकूण क्षेत्रफळाऐवजी केवळ दहा टक्क्यांपर्यंतच दाखवून कोट्यवधी रुपयांचा मालमत्ता कर वसुल करण्याच्या जागी केवळ लाखाचा मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे. हे पैसे पालिकेच्या तिजोरीत जमा होऊन मुंबईच्या विकासासाठी वापरले जाणे गरजेचे होते. मात्र, अधिकाऱ्यांनी स्वत:च्याच तिजोऱ्या भरल्या आहेत", असा आरोप काँग्रेसचे रवी राजा यांनी केला. वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे हे आमदार म्हणून निवडून विधानसभेवर आले आहेत. त्यामुळे ही संधी साधत भाजपकडून आदित्य ठाकरेंवर टीका करण्यात आली. "आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघात मालमत्ता कर वसुलीत १०० कोटींची तफावत असल्याचा काँग्रेसने 'घरचा आहेर' दिला. त्यामुळे तर पर्यावरण मंत्र्यांना कोविडची लागण झाली नाही ना?", असा टोला भातखळकर यांनी ट्वीटच्या माध्यमातून लगावला.

राज्याचे पर्यावरण मंत्री आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांना २० मार्चला कोरोनाची लागण झाली. आदित्य ठाकरे यांनी स्वःत ट्विट करुन याची माहिती दिली. तसेच आपल्या संपर्कात जे लोक आले होते त्यांनी स्वतःची कोरोनाची चाचणी करुन घ्यावी असं आवाहनही त्यांनी केलं होतं. त्यातच काल काँग्रेसने मुंबई महापालिकेतील घोटाळ्याचा आरोप केला. त्यातही वरळीतील मालमत्ता कराचा उल्लेख करण्यात आल्याने या संबंधी भाजपच्या अतुल भातखळकरांनी थेट आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT