मुंबई

Mumbai Accident : मुंबईत पुन्हा हिट अँड रन! मच्छी आणण्यासाठी गेलेल्या कोळी दाम्पत्याला उडवले

Worli Accident : मच्छी घेऊन परतत असताना एका चारचाकी गाडीने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. दुचाकीवर मोठ्या प्रमाणात मच्छी असल्याने गाडीचे नियंत्रण सुटले आणि दोघंही चार चाकी गाडीच्या बोनटवर पडले. अपघात होताच नवऱ्याने वेळीत गाडीच्या बोनटवरून बाजूला उडी टाकली. मात्र महिलेला स्वत:ला बाजूला होता आलं नाही.

संतोष कानडे

मुंबईः मुंबईमध्ये पुन्हा एकदा हिट अँड रनची घटना घडली असून मच्छी आणण्यासाठी गेलेल्या कोळी दाम्पत्याला एका कारने उडवले आणि फरफटत नेले. अपघातामध्ये कोळी महिलेचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होतोय.

रविवारी पहाटे साडेपाच वाजता मच्छी आणण्यासाठी गेलेल्या कोळी दाम्पत्याचा अपघात झाला. वरळीतल्या अॅट्रिया मॉलजवळ ही घटना घडली आहे. वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे नाकवा दांपत्य हे सकाळी ससून डॉकला मच्छी आणण्यासाठी गेले होते.

मच्छी घेऊन परतत असताना एका चारचाकी गाडीने त्यांच्या दुचाकीला मागून धडक दिली. दुचाकीवर मोठ्या प्रमाणात मच्छी असल्याने गाडीचे नियंत्रण सुटले आणि दोघंही चार चाकी गाडीच्या बोनटवर पडले. अपघात होताच नवऱ्याने वेळीत गाडीच्या बोनटवरून बाजूला उडी टाकली. मात्र महिलेला स्वत:ला बाजूला होता आलं नाही.

अपघातामुळे घाबरलेल्या चालकाने गाडी भरधाव वेगाने पळवली. त्यात कोळी महिलेला त्याने फरफटत नेले. अपघातात कारचालक पळून गेला असून कोळी महिलेला उपचारासाठी नायर रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले आहे. या प्रकरणी वरळी पोलिस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Parkash Ambedkar : सत्तेत सहभागी होण्याबाबत प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केली भूमिका, ते म्हणाले...

Maharashtra Assembly Election : सट्टाबाजारामध्ये महायुती ‘फेव्हरिट’!महाआघाडीला १ रुपयाला २ रुपये १५ पैसे भाव

Latest Maharashtra News Updates : जम्मूमध्ये अतिक्रमणविरोधी मोहीम

SCROLL FOR NEXT