मुंबई

अनधिकृत फेरीवाल्यांना बसणार दणका! महापौरांनी घेतला मोठा निर्णय!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसह काही नगरसेवक तसेच रहिवाशांनी विरोध केल्यानंतर पालिकेचे फेरीवाला धोरण रखडले होते. आता मात्र न्यायालयाच्या आदेशानुसार फेरीवाला धोरण राबवणार असून येत्या आठवडाभरात त्याची अंमलबजावणी करणार असल्याची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली; तसेच स्टॉलधारकांचे आहे त्याच जागेवर पुनर्वसन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यासाठी येत्या 3 किंवा 5 मार्च रोजी बैठक घेऊन अंतिम निर्णय घेऊ, असे त्यांनी म्हटले आहे. 

फेरीवाला धोरणाची अंमलबजावणी करण्याच्या हालचाली महापालिकेने सुरू केल्या असून पात्र फेरीवाल्यांचे पुनर्वसन करण्यासाठी पदपथांवर मार्किंग करण्यात येत आहे. लवकरच फेरीवाल्यांना महापालिकेकडून परवाने वाटप करण्यात येणार आहे; मात्र फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाला सोसायट्यांमधील रहिवाशांनी जोरदार विरोध केला आहे. त्यानंतर मनसेनेही याविरोधात मोर्चा काढून आपला विरोध दर्शविलेला आहे. त्यामुळे या विषयावर पुन्हा एकदा मनसेसह रहिवाशांचा विरोध अधिक तीव्र होण्याची शक्‍यता आहे. 
धोरणानुसार मुंबईतील पात्र फेरीवाल्यांचे त्याच परिसरामध्ये पुनर्वसन केले जाणार आहे. सर्वेक्षणानुसार दादर परिसरात 16 हजार 80 फेरीवाले पात्र ठरले आहेत. त्यातील 14 हजार 500 फेरीवाल्यांचे पुनर्वसन दादर परिसरातच केले जाणार आहे. यासाठी जी उत्तर विभाग कार्यालयाने दादर परिसरामधील पदपथांवर जागांची निश्‍चिती करणे सुरू केले आहे.

पदपथांवरील याच जागांवर फेरीवाल्यांचे पुनर्वसन केले जाणार आहे. 
टाऊन वेंडिंग कमिटीने आखलेल्या फेरीवाला धोरणानुसार पात्र फेरीवाल्यांचे पुनर्वसन हे रेल्वेस्थानक परिसरातून दीडशे मीटर बाहेर करावे लागते. त्याचबरोबर शाळा तसेच रुग्णालय परिसराच्या 100 मीटर बाहेर फेरीवाल्यांचे पुनर्वसन करावे लागणार आहे; मात्र दादर परिसरामध्ये स्टेशनच्या आसपास फेरीवाल्यांची मोठी गर्दी असल्याने या फेरीवाल्यांपैकी पात्र फेरीवाल्यांचे पुनर्वसन हे दादरच्या इतर परिसरामध्ये करावे लागणार आहे. त्यानुसार दादर परिसरातील जागा निवडण्यात आल्या असून तेथे पुनर्वसन करावे लागणार आहे; मात्र न्यायालयाच्या सर्व निर्देशांचा अभ्यास करून याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे पेडणेकर यांनी सांगितले. 

स्थानिक दुकानदार, रहिवाशांचा विरोध 
पुनर्वसनासाठी दादरमधील पद्माबाई ठक्कर मार्गावरील पदपथांवर महापालिकेने जागा निश्‍चित केल्या आहेत. याला परिसरातील दुकानदार तसेच रहिवाशांनी जोरदार विरोध केला आहे. इतर जागेवरील फेरीवाल्यांना आमच्या परिसरात आणून बसवल्यास या ठिकाणी बजबजपुरी माजेल, असे राहिवाशांचे म्हणणे आहे; तर याच मार्गावर मनसेचे मध्यवर्ती कार्यालय असल्याने मनसेनेही या धोरणाविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. 


 According to the court order, the hawkers policy will implement

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SIP Investment: शेअर बाजार कोसळत आहे; एसआयपी बंद करावी की सुरु ठेवावी? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Latest Maharashtra News Updates live : 'बाटोगे तो कटोगे' घोषणेवर भाजप खासदार कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT