Accused arrested sakal
मुंबई

ड्युटीवरुन परतणाऱ्या नर्सचा विनयभंग करणारा गजाआड!

नरेश शेंडे

कोरोना काळात स्वत:चा जीव धोक्यात टाकून कर्तव्य तत्पर असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.एका २८ वर्षीय नर्सचा विरार-डहाणू ट्रेनमध्ये एका मद्यधुंद तरुणाने विनयभंग(Nurse molested)केल्याची संतापजनक घटना रविवारी मध्यरात्री घडली.

मुंबई : कोरोना काळात स्वत:चा जीव धोक्यात टाकून कर्तव्य तत्पर असणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.एका २८ वर्षीय नर्सचा विरार-डहाणू ट्रेनमध्ये एका मद्यधुंद तरुणाने विनयभंग(Nurse molested)केल्याची संतापजनक घटना रविवारी मध्यरात्री घडली. सुखराम गानवा (22)असं या आरोपीचं नाव आहे.डहाणू रेल्वे स्टेशनवर(Dahanu Railway Station)नर्सने आरडाओरडा केल्यानंतर पळून जाणाऱ्या सुखरामला रेल्वे पोलिसांनी(GRP)पकडले. त्याने नर्सचा मोबईल चोरण्याचाही प्रयत्न केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपी सुखरामला दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. (Accused Sukhram ganva arrested for molesting a nurse in ladies coach tries to steal her mobile too)

वरिष्ठ रेल्वे पोलिस निरिक्षक योगेश देवरे यांनी दिलेल्या माहितीनुसार,या घटनेदरम्यान गैरहजर असलेल्या होम गार्डला निलंबीत करण्यात आले आहे. आरोपी सुखरान रेल्वे रुळावर काम करणारा कामगार (Contract labour)आहे. गानवाने मोबाईल चोरी करण्याच्या उद्देशाने ट्रेन मध्ये प्रवेश केला होता.यापूर्वीचा त्याचा क्रिमनल रेकॅार्ड नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

विरार स्थानकात नर्सने रात्री ११ वाजताच्या सुमारास ट्रेनमध्ये प्रवेश केला.तासाभरानंतर वाणगाव रेल्वे स्थानकात ट्रेन पोहोचली असता मोबाईलवर बोलत असलेल्या नर्सचा मोबाईल गानवाने खेचण्याचा प्रयत्न केला होता. धावत्या ट्रेनमध्ये त्या नर्सने स्वत:ला गानवापासून वाचविण्याचा प्रयत्न केला होता. डहाणू स्थानकातील फलाट क्र.४ वर मध्यरात्री नर्सच्या आरडाओरडा करण्याने आरोपीने तिच्यावर हल्ला करत पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. मात्र.ड्युटीवर असणाऱ्या रेल्वे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी गानवाच्या मुसक्या आवळल्या.गानवावर रेल्वे पोलिसांनी महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी कलम ३५४,चोरीचा प्रयत्न कलम ३९३, (IPC Act)विनाटिकीट महिलांच्या कोचमध्ये प्रवेश केल्याने कलम १३७ आणि १६२ (Indian railway Act) अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे.आरोपी गानवाला दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे.विरार परिसरात सीसीटिव्ही कॅमेरांअभावी आरोपींना शोधण्यात पोलिस यंत्रणांना अडथळा निर्माण होतो.त्यामुळं संबंधित सर्व परिसरातील रेल्वे स्थानकांत सीसीटिव्ही कॅमेरे बसविण्याची विनंती संबंधित प्रशासनाला करण्यात आली आहे.अशी माहिती वरिष्ठ रेल्वे पोलिस निरिक्षक योगेश देवरे यांनी दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

जनसंघ पक्ष म्हणून १९६२मध्ये निवडणुकीत उतरला; पहिल्या प्रयत्नात ० जागा, नंतर 'फिनिक्स'झेप, २०२४ मध्ये भाजपचा चढता आलेख किंगमेकर ठरला!

Maharashtra Assembly Election Result: भाजप पुन्हा नंबर वन, जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Maharashtra Election 2024: पंतप्रधान मोदींनी शिंदे-फडणवीस-पवारांचे केले अभिनंदन, म्हणाले, महाराष्ट्रात सत्याचा विजय

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: निकालाच्या दिवशी मुंबईत नक्की काय घडलं? वाचा एका क्लिकवर!

Daund Election Result 2024 : दौंड- राहुल कुल यांची हॅटट्रिक, १३ हजार मतांच्या फरकाने विजयी..!

SCROLL FOR NEXT