Crime on Illegal Dhaba sakal
मुंबई

Pub Bar Crime : नशेचे अड्डे उद्ध्वस्त! सरकारी यंत्रणांची पब, बारसह ढाब्‍यांवर कारवाई

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई - रात्रभर दारूच्या नशेत धिंगाणा घालणाऱ्या बेकायदा पब आणि डान्सबारच्या अनधिकृत बांधकामांवर अखेर सरकारी हातोडा चालवण्यात आला. नवी मुंबई महापालिका, राज्य उत्‍पादन शुल्क आणि पोलिसांनी संयुक्तरीत्या बुधवारी पहाटेपर्यंत शहरात कारवाई केली. कारवाईत तीन पब, चार लेडीज डान्सबार आणि पाच किरकोळ चायनीज हॉटेलचा समावेश आहे. सरकारी यंत्रणांनी अचानक केलेल्या कारवायांमुळे बार, पबचालकांचे धाबे दणाणले.

दारूच्या नशेत आलिशान गाडी चालवून दोन जणांना चिरडण्याची घटना नुकतीच पुण्यात घडली. त्‍या पार्श्वभूमीवर रात्रभर चालणाऱ्या पब आणि डान्सबारचा प्रश्न उपस्थित झाला आहे. नवी मुंबईतही याआधी रात्री उशिरा मद्यपान करून बेदरकार वाहन चालवून नागरिकांना चिरडण्याची घटना घडल्या आहेत. या धर्तीवर महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने मंगळवारी रात्री वाशी, नेरूळ आणि बेलापूर विभागात धडक मोहीम राबवली. बुधवारी पहाटेपर्यंत कारवाईत सुरू होती.

पब, लेडीज डान्सबार आणि चायनीज हॉटलचालकांनी इमारतीत अंतर्गत संरचनात्मक बदल केल्याचेही या वेळी निदर्शनास आले. नागरिकांच्या तक्रारीवरून बेलापूर आणि तुर्भे येथील तीन पब, बार आणि रेस्‍टॉरंट, बेलापूर येथे एक ढाबा, तीन चायनीज हॉटलवर कारवाई करीत एक लाख रुपयांचा दंड आकारण्यात आला. यापुढेही बेकायदा हॉटेल आणि बार, ढाब्‍यांवर कारवाई करण्यात येणार असून त्‍याबाबत अतिक्रमण विभागाने नियोजन केले आहे.

घणसोली, कोपरखैरणेतही कारवाई

घणसोली, कोपरखैरणे या भागातील महापालिकेच्या खाडी मार्गालगत अनेक बेकायदेशीर ढाबे, चायनीज, झोपडपट्ट्यांवर कारवाईचे नियोजन महापालिकेने केले आहे. तसेच एमआयडीसी भागातील बेकायदा हॉटेल, लॉजिंग आणि पबवरही कारवाई केली जाणार आहे.

६२ इमारती अतिधोकादायक

शहरातील ६२ इमारती अतिधोकादायक आहेत. त्यापैकी १४ इमारती महापालिकेने रिकामी केल्‍या आहेत. उर्वरित तत्काळ रित्‍या करण्यासाठी पाणी आणि वीजपुरवठा बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

नवी मुंबईत आगामी काळात बेकायदा हॉटेल, पब आणि बारवर कारवाई सुरूच राहणार आहे. त्यासोबत अनधिकृत झोपड्यांवरही कारवाई केली जाणार आहे.

- डॉ. राहुल गेठे, उपायुक्त, अतिक्रमण विभाग, नवी मुंबई महापालिका

२६ अल्पवयीन मुलांवर कारवाई

ठाण्यातील कारवाईत ड्रंक ॲण्ड ड्राईव्हनुसार, एक हजार ४५ जणांची झिंग पोलिसांनी उतरवली आहे; मात्र त्याचवेळी हिट अ‍ॅण्ड रनच्या २३ घटना समोर आल्या आहेत. त्यामध्ये ३६ जणांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी आहे. जीव गमावलेले बहुतेक तरुण वयाचे असल्याचेही समजते. २६ अल्पवयीन वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाहन परवाना नसतानादेखील गाडी चालवणाऱ्या २९५ जणांवर कारवाई केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT