Hariom Sweets Sakal
मुंबई

Ulhasnagar : पायाने समोशाचे पीठ तुडवणाऱ्या दुकानावर कारवाई; दुकान बंद करण्याची दिली नोटीस

सकाळ वृत्तसेवा

उल्हासनगर - मिठाई विक्रीच्या दुकानातील कारागीर हा समोसा, कचोरी साठी तयार करण्यात येणाऱ्या पिठाला पायाने तुडवतानाचा संतापजनक प्रकार व्हायरल व्हिडिओमुळे चव्हाट्यावर आल्यावर व गावकऱ्यांनी दुकानावर धडक देऊन दुकानातील साहित्य फेकून देण्यास भाग पाडल्याचा प्रकार सोमवारी उल्हासनगरात उघडकीस आला होता.

या प्रकाराची दखल घेऊन आज अन्न व सुरक्षा प्रशासनाच्या अधिकारी अरुणा विरकायदे यांनी दुकानातील खाद्य पदार्थांचे नमुने घेतले असून दुकान बंद करण्याची नोटीस दुकानदाराला बजावली आहे.

आशेळे गाव प्रवेशद्वारावर गेल्या 15 वर्षांपासून हरिओम स्वीट नावाचे दुकान आहे. या दुकानात मिठाई सोबत समोसे, कचोरी, वडापाव, ढोकला आदी खाद्यपदार्थ विक्रीसाठी असतात. जवळपास पंधरा ते वीस हजार लोकसंख्या असलेल्या गावाच्या वेशीवर हे एकमेव गोड व खाद्य पदार्थ विकणारे दुकान असल्याने अख्खे आशळे गाव या दुकानातून मिठाईची खरेदी करते. अशात दुकानातील कारागीर हा समोसे, कचोरीचे पीठ पायाने तुडवतानाचा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला होता.

या प्रकाराने संतप्त झालेल्या गोपी कडू, अंकुश कडू, परेश तरे, नितीन तरे, योगेश म्हात्रे, गोपाळ कडू, अशोक कडू, तात्या कारकर, मनीष तरे आदी गावकऱ्यांनी सोमवारी दुपारी हरिओम स्वीट दुकानावर धडक दिली. यावेळी दुकानदाराला जाब विचारला असता कारागिराने ही चूक केली असल्याचे मान्य केले होते.

मात्र पायाने पीठ तुडवण्याचा प्रकार हा गंभीर असल्याने विठ्ठलवाडी ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पडवळ यांनी अन्न व सुरक्षा प्रशासनाला कळवले होते. त्यानुसार आज अधिकारी अरुणा विरकायदे यांनी खाद्य पदार्थांचे नमुने घेऊन दुकान बंद करण्याची नोटीस बजावली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malad Assembly Constituency: विरोधकांच्या आधी शेलारांना पक्षातूनच विरोध! उमेदवारी विरोधात पदाधिकाऱ्यांचे पंतप्रधान मोदींना पत्र

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : पक्ष-उमेदवारांची अदलाबदल आघाड्यांची राजकीय अपरिहार्यता!

Mukesh Ambani: मुकेश अंबानींना टक्कर देणार भरतिया समूह; कोका-कोलामधील 40 टक्के हिस्सा खरेदी करणार

Khandesh News: भाजपच्या पहिल्या यादीत खानदेशातील 10 उमेदवार! विद्यमान आमदारांची उमेदवारी कायम; रावेर, धुळ्याला नव्या चेहऱ्याना संधी

Vidhansbha Election : महाविकास आघाडीचं ठरेना… अजूनही १७ जागांवर तिढा कायम; फायनल यादी कधी येणार?

SCROLL FOR NEXT