Salman Khan Residence Shooting esakal
मुंबई

अभिनेता Salman Khan च्या निवासाबाहेर गोळीबार; 2 आरोपींना गुजरातच्या भुजमधून अटक, नेमकं काय आहे प्रकरण?

सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराशी संबंध 2 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

गोळीबारानंतर मुंबईतून पळून गेलेल्या दोन्ही व्यक्तींना गुजरातमधील भुज शहरात अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी त्यांना मुंबईला पाठवण्यात येणार आहे.

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या (Actor Salman Khan) वांद्रे पश्चिम येथील निवासस्थानाबाहेर 14 एप्रिल रोजी गोळीबार केल्याप्रकरणी मुंबई गुन्हे शाखेने दोन आरोपींना अटक केलीये. या आरोपींना मंगळवारी गुजरातच्या भुज जिल्ह्यातून (Bhuj Gujarat) पकडण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी (Mumbai Crime Branch) दिली. या आरोपींबाबत अधिक तपशील पोलिस लवकरच उघड करतील.

दरम्यान, गोळीबारानंतर मुंबईतून पळून गेलेल्या दोन्ही व्यक्तींना गुजरातमधील भुज शहरात अटक करण्यात आली असून पुढील तपासासाठी त्यांना मुंबईला पाठवण्यात येणार आहे. आज दुपारी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर जास्तीत जास्त पोलीस कोठडीची मागणी करण्यात येणार आहे.

पोलिसांनी आरोपींकडून विदेशी पिस्तूल, जिवंत काडतुसे, मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त केली आहे. चौकशीदरम्यान त्यांनी सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याची कबुली दिली. रविवारी पहाटे ५ वाजता दोन अज्ञात हल्लेखोरांनी सलमान खानच्या वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंटसमोर गोळीबार केला होता.

गुन्हेगारी पार्श्वभूमी

या प्रकरणी आरोपी विशाल राहुलला अटक केल्यामुळे तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. प्रदेशात कार्यरत असलेल्या संघटित गुन्हेगारी नेटवर्कच्या व्याप्तीबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. कालू या नावाने ओळखल्या जाणाऱ्या विशालला हरियाणातील अनेक हत्या आणि दरोडे यासह अनेक जघन्य गुन्ह्यांमध्ये सहभागी आल्याचे तपास समोर आले आहे. विशाल उर्फ कालू असून तो लॉरेन्स बिश्नोई गँगमधील शूटर आहे.

विशाल गुडगावचा रहिवासी आहे. तो राजस्थानमधील गोदारा नावाच्या गुंडासाठी काम करतो. मूसवालासह अनेक हाय-प्रोफाइल खूनांमध्ये त्याचा सहभाग असल्याचा त्याच्यावर आरो आहे. अलीकडेच, तो लॉरेन्स बिश्नोईच्या सूचनेनुसार रोहतकमध्ये एका बुकीच्या हत्येमध्ये सामील होता.

Salman Khan Residence Shooting

दहशत पसरवण्याचा होता उद्देश

प्राथमिक तपासात गोळीबार करणाऱ्यांनी कोणत्याही व्यक्तीवर नाही तर हवेत गोळीबार केला. हा गोळीबार त्यांनी हल्ला करण्यासाठी नाही तर दहशत निर्माण करण्यासाठी आणि संदेश देण्यासाठी केल्याचा पोलिसाचा अंदाज आहे .दोघा आरोपीनी गेल्या काही दिवसांपासून सलमान खानच्या घराची रेकी केली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, या घटनेत वापरलेली दुचाकी नंतर एक किलोमीटर अंतरावर एका चर्चजवळ आढळली. दुचाकीची नोंदणी पनवेल येथील एका रहिवाशाच्या नावावर आहे. ही दुचाकी चोरीला गेली होती की नाही, याचा शोध पोलीस घेत आहेत.

एनआयएची एन्ट्री?

या प्रकरणी लॉरेन्स बिश्नोईचे नाव समोर आल्यावर आता राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) सतर्क झाली आहे. राज्याच्या दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) आणि एनआयए यांनीही वांद्रे येथील गॅलेक्सी अपार्टमेंट्सबाहेर घडलेल्या घटनेची चौकशी सुरू केली आहे. एटीएसकडून या प्रकरणी एनआयएने घटनेची माहिती मगवल्याची माहिती मिळत आहे. तथापि, आत्तापर्यंत एनआयएकडे प्रकरण हस्तांतरित करण्याची कोणतीही औपचारिक विनंती केलेली नाही. सध्या पोलिसांच्या 15 तुकड्या तपासात तैनात करण्यात आल्या आहेत.

घटनाक्रम

सलमानच्या बांद्रा येथील गॅलेक्सी या अपार्टमेंटच्या दिशेने दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केला. ही घटना पहाटे ५ वाजता घडली. तिथे उपस्थित असणाऱ्या व्यक्तींच्या व्यक्तव्यानुसार त्या दोघांनी गॅलेक्सीच्या दिशेने बंदुकीच्या तीन फैरी झाडल्या. ही घटना घडली तेव्हा सलमान घरातच होता. तर त्याचे इतर कुटुंबीय देखील घरात होते. या घटनेनंतर तातडीने मुंबई पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठत तपासत नेतृत्व केले.

या घटनेची दखल घेत बांद्रा पोलिसांनी दोन अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करत गुन्हे शाखेने तपास सुरू केला आहे. आतापर्यंतच्या तपासात आणखी एक पुरावा पोलिसांच्या हाती लागला आहे. हल्लेखोरांनी वापरलेल्या मोटारसायकल बांद्रा येथील एका चर्चच्या बाहेरून पोलिसांनी जप्त केल्या आहेत. सोबतच सलमानच्या घराची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे.

आरोपींनी गोळीबार केल्याची दिली कबुली

गुजरातमधील भुज शहरात एका विशेष पोलिस कारवाईमुळं फरार आरोपींना अटक करण्यात आली. त्यांनी चौकशीदरम्यान गोळीबार केल्याची कबुली दिली आणि त्यानंतर पुढील चौकशीसाठी त्यांना मुंबईत आणण्यात आले. पोलिसांनी पिस्तूल आणि इतर आक्षेपार्ह पुरावे जप्त केले आहेत. तपासात अधिक खुलासे होण्याची अपेक्षा आहे. पोलिस आयुक्त विवेक फणसळकर आणि विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती आज दुपारी पत्रकार परिषदेत या प्रकरणाची माहिती देणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: मोदींचा मेमरी लॉस... राहुल गांधींनी अमेरिकेच्या माजी अध्यक्षांचा किस्सा सांगत केली तुलना, अमरावतीत फटकेबाजी

Jhansi Fire Incident : फायर अलार्म वाजला असता तर वाचला असता 10 मुलांचा जीव!

Disha Patni : दिशा पटनीच्या वडिलांची झाली फसवणूक ; अध्यक्ष बनवण्यासाठी तब्बल 25 लाखांचा गंडा

अख्खं कुटुंबच उद्‌ध्वस्त झाल्याने चांदीनगरी हळहळली; शत्रूच्याही वाट्याला न यावा असा दुर्दैवी प्रसंग, नेमकं काय घडलं?

Latest Maharashtra News Updates live : सलग तिसऱ्या दिवशी अजित पवार नाशिक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT