मुंबई : नार्कोटिक्स (Narcotics) कंट्रोल ब्युरोचे मुंबई (Mumbai) विभागाचे संचालक समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. समीर वानखेडे यांच्यावर केलेल्या आरोपांना त्यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) हिने पत्रकार परिषद घेऊन सडेतोड उत्तरे देत आपल्या नव-याला पाठिंबा दिला आहे. यावेळी क्रांतीने सांगितले की, नबाब मलिक यांनी जे काही आरोप समीर यांच्यावर लावले आहेत ते सपशेल खोटे आहेत. आमच्याकडे कोर्टात जाऊन केस लढण्याइतके देखील पैसे नसल्याचे क्रांतीने यावेळी सांगितले आहे.
यावेळी क्रांती रेडकरसोबत समीर वानखेडे यांची बहीण यास्मीनही उपस्थित होती. यावेळी क्रांतीने सांगितले की, ' माझे पती समीर वानखेडे हे प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यांच्या प्रामाणिक असल्याचा अनेकांना त्रास होत आहे. त्यामुळेच त्यांनाच लक्ष्य केले जात आहे. समीर यांनी जातीचे कोणतेही बनावट सर्टिफिकेट केलेले नाही. जर त्यांनी असे केल्याचे पुरावे असतील तर त्यांनी न्यायालयात सादर करावेत' असे आव्हान दिले आहे. क्रांतीने पुढे सांगितले की, 'माझ्या पतीने कोणतेही चुकीचे काम केलेले नाही. त्यामुळे त्यांच्यावर जे आरोप करण्यात येत आहेत, ते आम्ही सहन करणार नाही. ज्या लोकांनी आमच्यावर आरोप केले आहेत. त्यांनी कोर्टात जावे आणि आमच्याविरोधात केस दाखल करावी.
आम्ही करोडपती नाहीत उलट आमची परिस्थिती सर्वसाधारण आहे. त्यामुळे कोर्टात जाणे हे आम्हाला परवडणारे नाही. समीर हे अतिशय प्रामाणिक अधिकारी आहेत. त्यामुळेच ते अनेकांच्या डोळ्यात खुपत आहेत. समीर यांनी गेल्या १५ वर्षांत प्रामाणिकपणे काम करून नाव कमावले आहे. या प्रकरणातही त्यांनी प्रामाणिकपणे काम केले आहे. परंतु या केसवरून त्यांना हटवण्यासाठी त्यांच्याविरोधात अतिशय वाईट आरोप करण्यात आले आहेत. आरोप करणा-यांनी समीर यांच्यावर ज्या पद्धतीने आरोप केले आहेत, ते करताना त्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत" असेही क्रांती म्हणाली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.