मुंबई

कोरोना साहित्याच्या वाहतुकीबद्दल झाला महत्त्वाचा निर्णय

अदानी उद्योग समुहाचं कोरोनाकाळात स्तुत्य पाऊल

कृष्णा जोशी

अदानी उद्योग समुहाचं कोरोनाकाळात स्तुत्य पाऊल

मुंबई: देशात सध्या कोरोनाची (Coronavirus) रूग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पण वैद्यकीय सेवांचा मात्र तुटवडा भासताना दिसतोय. अशा परिस्थितीत विविध देश आपापल्या परीने भारताला कोरोनासंबंधित साहित्याची आणि सेवांची मदत पाठवत आहेत. याच साहित्याच्या वाहतुकींबद्दल एक महत्त्वाचा निर्णय अदानी उद्योग (Adani Group) समूहाकडून घेण्यात आला आहे. अदानी उद्योगसमूहाने कोरोनाविरुद्धच्या युद्धात वेगवेगळ्या प्रकारे योगदान दिले असून त्यांच्यातर्फे व्यवस्थापन होणाऱ्या विमानतळांवर तसेच बंदरांवर कोरोनाविषयक साहित्यावरील विशिष्ट शुल्क माफ करण्यात आले आहे. (Adani Group Takes Important Decision about Corona Related Goods Services on Airports and Ports)

अदानी समूहाच्या माध्यमातून देशभर विविध ठिकाणी कोरोना रुग्णांच्या सेवेसाठी कामे होत आहेत. त्यांनी 780 टनांचे ऑक्सिजन टँकर (Medical Oxygen) आखाती देशांमधून आणि आग्नेय आशियाई देशांमधून आणले आहेत. याशिवाय 48 ऑक्सिजन टँक विविध देशांमधून मागवले आहेत. सौदी अरेबिया (80 टनांचे चार टँक), थायलँड (140 टनांचे सात टँक), सिंगापूर (160 टनांचे आठ टँक), दुबई (220 टनांचे 20 टँक), तैवान (180 टनांचे नऊ टँक) येथून त्यांनी अमूल्य अशा प्राणवायूचे टँक आणले आहेत. त्याचप्रमाणे देशभर ऑक्सिजन पुरवण्यासाठी त्यांनी जागतिक ऑक्सिजन उत्पादकांशी भागीदारी केली आहे. त्याचबरोबर त्यांच्यातर्फे देशात उच्च क्षमतेचे ऑक्सिजन निर्मिती व ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर निर्मितीचे 17 कारखानेही उभारले जातील.

अहमदाबादच्या अदानी विद्यामंदिर शाळेत ऑक्सिजन खाटांसह कोविड केंद्र उभारण्यात आले आहे. यात तज्ञ डॉक्टरांसह मध्यम आजारी रुग्णांसाठी विलगीकरण कक्षही आहे. तर भूजच्या गुजरात अदानी इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसचे रुपांतर ऑक्सिजनयुक्त आठशे खाटांच्या अत्याधुनिक रुग्णालयात करण्यात आले आहे. मुंद्रा येथील अदाणी रुग्णालयातील रुग्ण क्षमताही दुप्पट करण्यात आली असून येथील ऑक्सिजन खाटांची संख्याही शंभरपर्यंत वाढविण्यात आली आहे.

विमानतळांवर शुल्कमाफी

कोरोना उपचारसंबंधी सामान घेऊन येणाऱ्या जहाजांना प्राधान्याने नांगरणीची व सामान उतरविण्याची सुविधा दिली जात आहे. तसेच अशा सामानांची साठवणूक, हाताळणी व जहाजसंबंधीचे शुल्क अदाणीच्या बंदराकडून माफ करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे असे सामान आणणाऱ्या विमानांसाठी सर्व प्रकारचे वाहन संबंधी शुल्कदेखील अदाणी विमानतळांवर माफ करण्यात आले आहे.

(संपादन- विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Fire News: कल्याणमध्ये गगनचुंबी इमारतीला भीषण आग; घटनास्थळी अग्निशमन दलाच्या ९ गाड्या दाखल

Latest Marathi News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

Jalgaon Jamod Assembly Election 2024 Result : जलंब मतदार संघाचा विक्रम मोडत जळगावने रचला नवा इतिहास

Phulambri Assembly Election 2024 Result : फुलंब्री विधानसभेत 25 जणांचे डिपॉझिट जप्त! मनसेसह 19 उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मतदान

CSK ची साथ सुटताच Deepak Chahar च्या बहीण अन् पत्नीची स्पेशल सोशल मीडिया पोस्ट; पाहा काय लिहिलंय

SCROLL FOR NEXT