महाड : महाड अतिरिक्त औद्योगिक क्षेत्रामधील ब्ल्यू जेट हेल्थकेअर या कंपनीमध्ये काल झालेल्या स्फोटामध्ये सात कामगारांचा मृत्यू झाला आहे. या कामगारांपैकी एक आदित्य मोरे तरुणांबद्दल एक दुखःद बाब समोर आली आहे. आदित्य मोरे याने अपघातापूर्वीच तीन डिसेंबरला असलेली आपली सेकंड शिफ्ट बदलून फर्स्ट शिफ्ट मागून घेतली होती. आदित्यची ही चूक त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरली आहे. या दुर्घटनेमुळे केवळ तीनच महिन्यापूर्वी कामाला लागलेल्या आदित्य मोरेचे एमएससी होण्याचे स्वप्न देखील अपूर्ण राहिले आहे.
ब्लू जेट हेल्थकेअर या कारखान्यांमध्ये शुक्रवारी तीन नोव्हेंबरला भीषण स्फोट होऊन सात कामगार गंभीर जखमी झाले. तर बेपत्ता असलेल्या अकारा कामगारांपैकी सात कामगारांचे मृतदेह सापडले आहेत. उर्वरित दगावलेल्या कामगारांची शोध मोहीम अद्यापही सुरूच आहे. सापडलेले मृतदेह अक्षरश: जळून खाक झाल्याने त्यांची ओळख पटवणे खूपच अवघड झाले आहे.
या अपघातात दगावलेल्या मृतांच्या आता केवळ आठवणीच उरल्या आहेत. महाड शहराजवळ असणाऱ्या चोचींदे गावातील आदित्य मोरे हा तरुण नुकताच बीएससी पास झाला. आदित्यचे वडील एका औषध दुकानात कामाला आहे. मुलाला त्यांनी शिकवून मोठे केले. केवळ तीनच महिन्यापूर्वी आदित्य ब्लू जेट कंपनीमध्ये कामाला लागला होता. एकीकडे आपले काम सांभाळत असताना त्याला एम एस सी होण्याची मोठी इच्छा होती. त्यामुळे त्यांनी काही आपल्या मित्रांसोबत एमएससीला देखील ऍडमिशन घेतले होते.
तीन नोव्हेंबरला आदित्य याची सेकंड शिफ्ट होती. परंतु काही कारणास्तव त्यांनी ही शिफ्ट बदलून फर्स्ट शिफ्टसाठी आपली ड्युटी घेतली. आणि कामावर असताना ब्ल्यू जेट कंपनीमध्ये भीषण स्फोट झाला. या दगावलेल्या कामगारांमध्ये आदित्यचा देखील समावेश आहे. आपल्या गावातील तरुण मुलाच्या या दुर्दैवी घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये शोककळा पसरली आहे. एमएससी होण्याचे आदित्यचे स्वप्न मात्र अपूर्णच राहिले.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.