Narayan Rane and Aditya Thackeray 
मुंबई

Aditya Thackeray: आदित्य ठाकरे बैठकांमध्ये दिसणार नाहीत, तर तुरुंगात...; राणेंचा पुन्हा निशाणा

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा नुकताच कोकण दौरा झाला, त्यानंतर नारायण राणेंनी त्यांच्यावर निशाणा साधला.

Amit Ujagare (अमित उजागरे)

मुंबई : युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा नुकताच कोकण दौरा झाला. या दौऱ्यात त्यांनी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना भेटी दिल्या. इथं शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या घरी आंगण बैठका घेतल्या.

यानंतर आता केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेत पुन्हा एकदा सुशांतसिंह प्रकरणाचा दाखला देत आदित्य ठाकरे लवकरच तुरुंगात जाणार असल्याचं विधान केलं आहे. (Aditya Thackeray will soon go to jail will not appear in meetings says Narayan Rane)

आदित्य ठाकरे जेलमध्ये असेल

राणे म्हणाले, "जे जाहीर सभा घेऊ शकत नाही ते खळ्यात सभा घेण्यासाठी आलं आले. आज काय शिवसेनेची स्थिती आहे. थोड्या दिवसांनी सुशांत सिंह राजपुतच्या केसमध्ये हाच आदित्य ठाकरे बैठकांना नसेल जेलमध्ये असेल, संजय राऊत पण असेल त्यांच्याबरोबर. ज्या शिवसेनेचं आता काहीही राहिलेलं नाही त्यांचे १६० आमदार येणार म्हणता?" (Latest Marathi News)

पाकिटं कुठल्या मजल्यावर जायची मला माहिती

"ज्यांनी पाकिटांची डिलिव्हरी केली त्यांनी बोलू नये. कुठे गेले खोके, कसे जात होते ते? वेळ कुठली असायची, कुणाच्या हातात दिले, कुठल्या माळ्यावर जायचे? मला सगळं माहिती आहे. पण त्या मातोश्रीवर बाळासाहेब ठाकरे रहायचे म्हणून मला त्यावर अधिक काही बोलायचं नाही.

एकनाथ शिंदे हा पोहोचवणाऱ्यांपैकी एक आहे, घरी नेणाऱ्यांपैकी नाही. त्यामुळं ठाकरेंनी खोके खोके बोलायचं सोडा निवडणुकीत तुमचं काहीही होणार नाही," अशा शब्दांत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. (Marathi Tajya Batmya)

आदित्य ठाकरेंच्यां अंगण बैठका

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांचा नुकताच कोकण दौरा पार पडला. २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी त्यांनी अनुक्रमे रत्नागिरी, सिंधुदुर्गचा दौरा केला. इथल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांघरी त्यांनी अंगण बैठका घेतल्या. त्यांच्या दौऱ्याची बरीच चर्चा झाली. कुडाळ, बांबार्डे, कणकवली, देवगड, राजापूर, करबुडे, महाड अशा ठिकाणी त्यांच्या भेटीगाठी, बैठका झाल्या. आमदार भास्कर जाधव, आमदार संजय कदम यांच्या घरीही त्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठका घेतल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar यांच्यावर टीका का करत नाही? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'मी विचलित...'

Latest Maharashtra News Updates : पुण्यात सुप्रिया सुळे यांच्या बॅगांची तपासणी

Sovereign Gold Bond: सरकारी योजनेत गुंतवणूकदारांचे पैसे झाले दुप्पट

Maratha Reservation: सरकारमुळेच माझ्या मुलाचा जीव गेला; आरक्षणासाठी जीव देणाऱ्या प्रतिकच्या आईचा जरांगेंसमोर टाहो

A Unique Hat trick: ऑस्ट्रेलियन फिरकीपटूची अनोखी हॅटट्रिक; ३६ वर्षांपूर्वी कर्टनी वॉल्श यांनी केली होती अशी कामगिरी

SCROLL FOR NEXT