Crime News esakal
मुंबई

Crime News: प्रशासन अलर्ट मोडवर; सार्वजनिक शांतता भंग केल्याने १,५८४ जणांवर कारवाई

आगामी लोकसभा निवडणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी जिल्हा पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे |The district police administration has been alerted for the peaceful conduct of the upcoming Lok Sabha elections

सकाळ वृत्तसेवा

निवडणुकीदरम्यान रायगड जिल्ह्यात नेहमीच वादविवाद होतात. मागील निवडणुकीत निर्माण झालेला वाद अद्यापही न्यायालयीन प्रक्रियेत आहे. असे असताना आगामी लोकसभा निवडणुका शांततेत पार पडाव्यात, यासाठी जिल्हा पोलिस प्रशासन सतर्क झाले आहे.

आचारसंहिता लागू असल्‍याने, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. जिल्ह्यात सार्वजनिक शांतता भंग केल्याने विविध कलमान्वये १,५८४ जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

वादविवाद किंवा भांडणास प्रोत्साहन करणे, हाणामारीत सहभाग, प्रक्षोपक भाषण करून कायदा सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. लोकसभा निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलिस ॲक्शन मोडवर असल्याची माहिती पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली.

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता १६ मार्च रोजी दुपारी लागताच जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. निवडणूक काळात राजकीय वादविवाद, पूर्व वैमनस्य उफाळून येण्याची शक्यता असल्‍याने जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षक यांची संयुक्त समिती पिस्तूल, रायफल व इतर अग्निशस्‍त्रे जमा करून घेण्याची कार्यवाही पूर्ण करीत आहे.

शस्‍त्र जमा करण्याचे निर्देश

परवानाधारकांकडील शस्‍त्र जमा करून घेण्यात येत आहेत. रायगड जिल्ह्यात पंचवीस पोलिस ठाणे असून १,६९१ जणांना शस्‍त्र परवाने दिले आहेत. यापैकी ६९२ शस्‍त्रे जमा करण्यात आली आहेत. तर गुन्ह्याच्या अनुषंगाने दहा शस्‍त्रे जमा करण्यात आले आहे.

तर १२ जणांचे परवाने रद्द केले आहेत. १२९ परवानाधारकांना सूट देण्यात आली आहे. ८४८ शस्‍त्रे अद्याप जमा झाली नसल्‍याची माहिती अप्पर अधीक्षक अतुल झेंडे यांनी दिली. त्याचप्रमाणे अवैध शस्‍त्र बाळगून निवडणुकीच्या काळात मतदारांना धमकी देणाऱ्यांवर पोलिसांची नजर आहे.

दारूबंदी कारवाई

जिल्ह्यात दारूबंदी कारवाईअंतर्गत १५१ गुन्हे दाखल करून ६,९१३ लिटर दारू जप्त केली आहे. त्याची किंमत ४ लाख ३० हजार रुपये इतकी आहे. पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांचे याबाबत प्रशिक्षण घेण्यात आले आहे. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व शांततेत पार पाडण्यासाठी यंत्रणा सज्ज आहे. गुन्हा करण्यास उत्तेजन केल्‍याप्रकरणी रायगड पोलिसांनी १,४४३ जणांवर कारवाई केली आहे.

निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज असून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत. प्रत्‍येक नागरिकाने प्रत्येकाने आचारसंहितेचे पालन करावे, कायद्याचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्यात येणार आहे.

- सोमनाथ घार्गे, पोलिस अधीक्षक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपचे मंगल प्रभात लोढा आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT