मुंबई

वृक्ष संवर्धनाची ऐसी की तैसी! खोडांना लोखंडी चूका ठोकून जाहिरातबाजी

सुभाष कडू

उरण -:उरण तालुक्यात वृक्ष संवर्धनाची ऐसी की तैसी आशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सिलींक सिटीची जाहिरात करणारे पत्र्याचे बोर्ड रस्त्याच्या कडेला संवर्धित केलेल्या झाडांच्या खोडाला लोखंडी चूका ठोकून लावले आहेत. त्यामूळे याचा झाडांच्या वाढीवर परीणाम होवून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरत आहेत.

सदर बोर्ड गव्हाण फाटा ते  चिरनेर, चिरनेर ते खारपाडा,कोप्रोली ते चिरनेर,कोप्रोली ते वशेणी आशा रस्त्यांच्या कडेला आसलेल्या झाडांवर ठोकले आहेत. ही झाडं सरकारी संस्था, स्थानिक ग्रामपंचायती, सामाजिक संस्था यांनी लावलेली व संवर्धित केलेली आहेत. विशेष म्हणजे वन विभाग व सर्व शासकीय आस्थापने दरवर्षी मोठी जाहिरातबाजी करुन हे वृक्षारोपण करत असतात. त्या रस्त्यांवरील अनेक अधिकारी या रस्त्यांवरुन ये जा करतात. त्यांच्या निदर्शनास ही बाब येवू नये हे खेदजनक आहे.
त्यामूळे करोडो रुपये खर्च करुन लावली जाणारी व संवर्धित केलेली ही झाडं सिलींक सिटीच्या जाहीरातीसाठी  वापरली जात आहेत. उरणमधील संबंधित प्रशासानाचे मात्र दूर्लक्ष होत आहे. त्याबाबत पर्यावरण संस्थानी नाराजी व्यक्त केली आहे. त्यामूळे उरण मध्ये केंद्र शासनाच्या "झाडे लावा झाडे जगवा" या घोषणेला हारताळ फासल्याचे दिसत आहे. 

झाडांच्या खोडांवर खिळे ठोकून बोर्ड लावणे,हे चूकीच आहे.मि ते  बोर्ड काढण्यास सांगतो 
आर्जून जाधव
  लिगल डिपार्टमेंट सिलींक सिटीची 

आम्ही आशी परवानगी कुणालाही दिली नाही.आणी जर सार्वजनीक बांधकाम विभागाच्या जागेत ती झाडं आसतील,तर त्यांच्यावर आमचा कारवाई करण्याचा प्रश्न येत नाही
शशांक कदम
विभागीय वन आधीकारी उरण

असे बोर्ड लावले आसतील,तर सदर कंपनीला नोटीस देवून .ते बोर्ड काढायला सांगतो

सि.बी. बांगर
 शाखा आभियंता सार्वजनीक बांधकाम विभाग

Advertising on tree by tapping iron nail in uran raiigad

--------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SIP Investment: शेअर बाजार कोसळत आहे; एसआयपी बंद करावी की सुरु ठेवावी? काय आहे तज्ज्ञांचा सल्ला?

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

Latest Maharashtra News Updates live : 'बाटोगे तो कटोगे' घोषणेवर भाजप खासदार कंगना रणौतने दिली प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT