मुंबई

तेजस पुन्हा ट्रॅकवर; पहिल्याच दिवशी प्रवाशांचा तुफान प्रतिसाद

कुलदीप घायवट

मुंबई, ता. 14 : पश्चिम रेल्वे मार्गावरील पहिली खासगी तेजस एक्सप्रेस प्रवाशांसाठी रविवारी, (ता.14) रोजी खुली झाली. या एक्सप्रेसला प्रवाशांनी पहिल्याच दिवशी तुफान प्रतिसाद दिला. तर, 14 फेब्रुवारी लग्नाचा वाढदिवस असलेल्या प्रवाशांचा वाढदिवस साजरा करण्यात आला.

रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉपोर्रेशन (आयआरसीटीसी) यांच्यावतीने खासगी तेजस एक्सप्रेस चालविण्यात येत आहे. पहिल्याच दिवशी दोन्ही दिशेकडील फेरीमध्ये सुमारे 1 हजार 600 प्रवाशांनी प्रवास केला. तर, एका फेरीमध्ये सुमारे 800 प्रवाशांनी प्रवास केला. तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवाशांचे वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस साजरा केला जातो. यासह सण-उत्सव, राष्ट्रीय सण साजरे करण्यावर भर दिला जातो.

14 फेब्रुवारी, 'व्हॅलेंटाईन डे'च्या दिवशी तेजस एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या दोन जोडप्यांचा लग्नाचा वाढदिवस होता. या प्रवाशांचा लग्नाचा वाढदिवस तेजस एक्सप्रेसमधील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केक कापून साजरा केला. लग्नाचा वाढदिवस आणि तेजस एक्सप्रेसमधील प्रवास कायम स्मरणात राहील, अशी प्रतिक्रिया तेजस एक्सप्रेसमधील प्रवाशांनी दिली.

प्रवाशांचा प्रवास आनंददायी, सुरक्षित होण्यासाठी आयआरसीटीसीकडून भर दिला जात आहे. प्रवासीभिमुख सुविधा प्रवाशांना प्रदान करण्याचा नेहमी प्रयत्न केला जातो. तेजस एक्सप्रेसमधील प्रवास प्रवाशांच्या स्मरणात राहण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने कल्पना लढविल्या जात आहेत. एक्सप्रेसने प्रवास करणार्‍या प्रवाशांना सुरक्षा किट देण्यात येणार आहे. प्रवाशांनी एक्सप्रेसमधून प्रवास केल्यानंतर एक्सप्रेसचे, सीटचे सॅनिटायझेशन केले जाणार आहे, अशी माहिती आयआरसीटीसीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

खासगी तेजस एक्सप्रेसला अंधेरी येथे विशेष थांबा 

  • पश्चिम रेल्वे मार्गावरुन धावणारी गाडी क्रमांक 82901/82902 मुंबई सेंट्रल - अहमदाबाद तेजस एक्सप्रेसला अंधेरी येथे विशेष थांबा देण्यात आला आहे. हा थांबा 29 मार्चपर्यंत देण्यात येण्याचा निर्णय पश्चिम रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.  
  • गाडी क्रमांक 82901 मुंबई सेंट्रल - अहमदाबाद तेजस एक्सप्रेस दुपारी 3.56 वाजता अंधेरी येथे थांबा घेण्यात येईल. तर, दुपारी 3.58 वाजता येथून सुटेल.
  • गाडी क्रमांक 82902 अहमदाबाद - मुंबई सेंट्रल तेजस एक्सप्रेस अंधेरी येथे दुपारी 12.28 वाजता थांबा घेऊन दुपारी 12.30 येथून मुंबई सेंट्रलसाठी सुटेल.

प्रवाशांच्या सुविधेसाठी अंधेरी स्थानकावर 29 मार्चपर्यंत थांबा देण्यात आल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी दिली.

महत्त्वाची बातमी :  "राज्याच्या शिक्षण व्यवस्थेत गोंधळ माजविण्याचे काम उदय सामंत करतायत, चमकोगिरी नको सुधारणा करा"

काेराेनामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मार्च 2020 पासून देशात धावणार्‍या तिन्ही खासगी तेजस एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या हाेत्या. त्यानंतर ऑक्टोबर 2020 मध्ये पुन्हा या एक्सप्रेस  सुरू केल्या. त्यानुसार आयआरसीटीसी तेजस एक्सप्रेस चालविण्यासाठी सज्ज झाले होते. मात्र प्रवाशांचा प्रतिसाद न मिळाल्याने नोव्हेंबर 2020 मध्ये पुन्हा तेजस एक्सप्रेस बंद करण्यात आली. आता प्रवाशांच्या सोयीसाठी तेजस एक्सप्रेस आठवड्यातून शुक्रवार, शनिवार, रविवार आणि सोमवार या चार दिवस धावणार आहे, अशी आयआरसीटीसीकडून देण्यात आली. 

रेल्वे मंत्रालय आणि इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉपोर्रेशन (आयआरसीटीसी) यांच्यावतीने भारतीय रेल्वे मार्गावरील दुसरी आणि पश्चिम रेल्वे मार्गावरील पहिली खासगी तत्त्वावरील मुंबई-अहमदाबाद तेजस एक्सप्रेस 17 जानेवारी 2020 पासून सुरू झाली. दिल्ली ते लखनऊ तेजस एक्सप्रेस देशातील पहिली खासगी गाडी 4 ऑक्टोबर 2019 रोजी धावली. 

after corona break IRCTCs tejas express back on track with massive response

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nana Patole : अखेर नाना पटोले देणार राजीनामा? विधानसभा निवडणुकीतील दारुण पराभवाची स्विकारली जबाबदारी

Aadhaar Update : अलर्ट! आधार कार्ड अपडेटच्या नियमात मोठा बदल; हे कागदपत्र नसेल तर बदलता येणार नाही माहिती

Kamthi Assembly Election 2024 : कामठीमधील १७ उमेदवारांचे ‘डिपॉझिट’ जप्त...निवडणूक आयोगाने ठरवून दिलेली मते घेण्यात ठरले अपयशी

Ajit Pawar: मुख्यमंत्रीपदाच्या फॉर्म्युल्याबाबत अजित पवारांचं महत्वाचं भाष्य; म्हणाले, आम्ही तिघं...

Stock Market: महाराष्ट्रात भाजपच्या विजयानंतर अदानी शेअर्समध्ये तुफान वाढ; सेन्सेक्स-निफ्टीही तेजीत

SCROLL FOR NEXT