Anil Gote Team eSakal
मुंबई

ईडीनंतर फडणवीसांविरोधात अनिल गोटेंची मुंबई पोलिसांत तक्रार

इक्बाल मिर्चीशी संबंधित कंपनीकडून भाजपने देणगी घेतल्याचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आणि माजी आमदार अनिल गोटे (Anil Gote) यांनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnvis) यांच्याविरोधात मुंबई पोलिसांमध्ये कथीत भ्रष्टाचारविरोधी तक्रार दाखल केली आहे. कालच त्यांनी यासंदर्भात मुंबईतील ईडी कार्यालयात तक्रार दिली आहे. पोलिसांमध्ये तक्रार देण्यापूर्वी गोटे यांनी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Panday) यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. (after ED Anil Gote lodged a complaint against Devendra Fadnavis in Mumbai Police)

गोटे म्हणाले, "मी पोलीस आयुक्तांशी दोन विषयांवर चर्चा केली तसेच फडणवीसांविरोधात तक्रार दिली. पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्याकडे पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेच्या भ्रष्टाचारप्रकरणाचा तपास सुरु आहे. त्या तपासामध्ये मदत करावी म्हणून मी त्यांना लाभार्थ्यांची दोन नावं दिली. सन २०१४-१५ मध्ये तसेच सन २०१७-१८ मध्ये प्रत्येकी दहा कोटी असे एकूण वीस कोटी रुपये भाजपला देणगी स्वरुपात देण्यात आली. निवडणूक आयोगाच्या कागदपत्रात याचा उल्लेख आहे, याचे पुरावे मी त्यांच्याकडे दिले आहेत.

तर दुसरी केस ही मुंबई फेस्टिव्हलची आहे. सन २०१८ मध्ये मुंबईमध्ये मुंबई फेस्टिव्हल घेण्यात आला. यासाठी ९० कोटी रुपये खर्च झाले. पण मुळात असा सरकारचा कोणताही कार्यक्रम नव्हता. पण तत्कालीन मंत्री जयकुमार रावल यांनी स्वतःच्या अधिकारात हा फेस्टिव्हल घेतला. यासाठी एक वर्षांचा टेंडर मागवला. पण प्रत्यक्ष टेंडर देताना याची मुदत पाच वर्षांसाठी वाढवली, जे बेकायदा आहे. यासाठी त्यांनी अशुतोष राठोड या सहव्यवस्थापकीय संचालकांकडे याची जबाबदारी सोपवली. पण महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात हे पद अस्तित्वात नाही. पण अशुतोष राठोड या व्यक्तीला त्यांनी शोधून आणलं ज्याच्यावर नाशिकमध्ये तीन गुन्हे दाखल आहेत. याकाळात जे खरे एमडी होते ते विजय वाघमारे सुट्टीवर असताना हा प्रकार घडला. याबाबत त्यांनी सचिवालयाला एक पत्र लिहिलं. या पत्रात त्यांनी हा गुन्हेगारी प्रकार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळं याची विशेष अधिकाऱ्याकडून चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही आयुक्तांकडे केल्याची माहिती गोटे यांनी दिली.

दरम्यान, ज्या विजय गौतम या अधिकाऱ्यांनी ही फाईल वर्षा बंगल्यावर संध्याकाळी पाच वाजता पाठवली त्या गौतम यांची सकाळी सात वाजता तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदली करुन टाकली. म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी भ्रष्टाचारी मंत्र्याला पाठीशी घातलं. सभागृहात क्लीनचीट दिली. इतकंच नव्हे हे प्रकरण दाबून टाकलं. त्यामुळं मी संजय पांडे यांच्याकडे याबाबत तक्रार केलेली आहे. यावर चौकशी करुन कारवाई केली जाईल असं आश्वासनं आपल्याला पोलीस आयुक्तांकडून देण्यात आलं आहे, अशी माहिती अनिल गोटे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray : राज ठाकरेंनी सभा थांबवून कोणाला सांगितले स्टेजवर बसायला?

Uddhav Thackeray : ‘मविआ’ सत्तेत आल्यास महागाई नियंत्रणात आणू....उद्धव ठाकरे : सिल्लोडच्या सभेतून नागरिकांना आश्वासन

Latest Maharashtra News Updates live : पंतप्रधान नरेंद्र मोदी आजपासून नायजेरिया, ब्राझिल आणि गयानाच्या सहा दिवसांच्या दौऱ्यावर, ब्राझिलमध्ये जी-20 शिखर परिषदेला राहणार उपस्थित.

"तिला मी नाही तिने मला सोडलं" परवीन बाबींबाबत पूर्वाश्रमीचे जोडीदार कबीर बेदींचा धक्कादायक खुलासा ; "तिला भीती..."

Suryakumar Video: 'भाई लोग, वेलडन...'द. आफ्रिकेला त्यांच्याच घरात पराभूत केल्यानंतर ड्रेसिंग रुममध्ये कॅप्टन सूर्याचं स्पेशल भाषण

SCROLL FOR NEXT