मोखाड्यातील कुपोषण, माता आणि बालमृत्यू च्या घटनांना आळा घालण्यासाठी आरोग्य व्यवस्था तोकडी पडत आहे. sakal
मुंबई

आठ वर्षाच्या पाठपुराव्यानंतर खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे होणार ग्रामीण रूग्णालय

मोखाड्यातील कुपोषण, माता आणि बालमृत्यू च्या घटनांना आळा घालण्यासाठी आरोग्य व्यवस्था तोकडी पडत आहे.

भगवान खैरनार ः सकाळ वृत्तसेवा

मोखाडा -  मोखाड्यातील कुपोषण, माता आणि बालमृत्यू च्या घटनांना आळा घालण्यासाठी आरोग्य व्यवस्था तोकडी पडत आहे. त्यामुळे तालुक्यातील हजारो नागरीकांच्या आरोग्याची काळजी घेणार्या खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणी वर्धन करून  ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा मिळावा अशी गेली  8  वर्षापासून येथील स्थानिक रहिवासी आणि लोकप्रतिनिधी केली होती.

त्याविषयी सकाळ ने गेली आठ वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केला आहे. अखेर, विधानसभा निवडणुकीपुर्वी महायुती सरकार ने खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला, ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा दिला आहे. त्यामुळे खोडाळावासी आणि लगतच्या तालुक्यातील रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.

 पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम मोखाडा तालुक्यात कुपोषण, माता आणि बालमृत्यू च्या घटना सातत्याने घडत आहेत. त्यांना आळा घालण्यासाठी आरोग्य यंत्रणा तोकडी पडत आहे. त्यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचे सर्व सोयी सुविधायुक्त रूग्णालय होऊन येथील आदिवासींना ऊपचार मिळावे म्हणून खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राला ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा मिळावा अशी मागणी पुढे आली.

सन  2018  पासुन खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणी वर्धन करून ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा मिळावा अशी मागणी येथील नागरीक, लोकप्रतिनिधी आणि सकाळ ने बातमी प्रसिद्ध केली होती. 

त्याची दखल घेत तत्कालीन आरोग्य मंत्री डाॅ. दिपक सावंत यांनी खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणी वर्धन करून ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा मिळावा, असा प्रस्ताव सावंतनी सादर केला होता. मात्र, त्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ही मागणी कालबाह्य झाली होती. मात्र, येथील लोकप्रतिनिधी आणि सकाळ ने ही मागणी कायम लावुन धरली होती. खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रावर मोखाड्यातील  35  हजार नागरिकांसह लगतच्या जव्हार, वाडा, शहापुर, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी तालुक्यातील रूग्णांचा भार आहे. 

 विधानसभा निवडणुकीपुर्वी महायुती सरकार ने रोजच कॅबिनेट मंत्र्यांच्या बैठका घेत, निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. अखेर,  3  ऑक्टोबर ला झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणी वर्धन करून ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे मोखाड्यातील आदिवासींना मोठा दिलासा मिळाला आहे. आता ग्रामीण रूग्णालय प्रत्यक्षात साकारण्याची प्रतिक्षा येथील नागरीकांना लागली आहे.

खोडाळा ग्रामपंचायतीने गावठाण ची जागा ऊपलब्ध केली

खोडाळा येथे सुसज्ज ग्रामीण रूग्णालय व्हावे म्हणून ग्रामपंचायती ने गावठाण ची जागा ऊपलब्ध केली आहे. आता या जागेची तातडीने मोजणी करून पुढील कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाने तातडीने हालचाली करणे अपेक्षित आहे. महायुती सरकार ने गेली  8  वर्षाची मागणी मान्य करून, आदिवासी भागाला न्याय दिल्याचे मतं, खोडाळ्याचे उपसरपंच ऊमेश येलमामे यांनी व्यक्त केले आहे. 

मुख्य सचिवांकडे पुढील कार्यवाहीसाठी पाठपुरावा करणार

माझ्या कार्यकाळात खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणी वर्धन करून ग्रामीण रूग्णालयाचा दर्जा मिळावा, म्हणून प्रस्ताव सादर केला होता. आता महायुती सरकार ने त्याला मंजुरी देऊन त्याला मुर्त रूप दिले आहे. येथील पदनिर्मीती आणि ईमारत बांधकामाला तातडीने मंजुरी देऊन आर्थिक तरतुदी ही करावी, अशी लेखी मागणी मुख्य सचिवांची भेट घेऊन करणार आहे. 

-डाॅ. दिपक सावंत, माजी आरोग्य मंत्री.           

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नवा इतिहास अन् प्रभावी कामगिरी... शताब्दी वर्षात पदार्पण करणाऱ्या RSSला महाराष्ट्र BJPकडून अनोखी गुरूदक्षिणा

IND vs AUS 1st Test : यशस्वी जैस्वालच्या १५० धावा! पर्थवर ऑस्ट्रेलियाला झोडले, धक्के तिथे पाकिस्तानमध्ये बसले; जगात ठरलाय भारी

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या हातातून महाराष्ट्र गेला, आता मुंबईही जाणार? महापालिका निवडणुकीत महायुतीचा प्रभाव

Maharashtra Assembly Election 2024 Result: धाकधूक... हुरहूर... अन्‌ जल्‍लोष

"आमचा राजा नाही, महाराष्ट्र हरलास तू"; मनसेच्या धक्कादायक पराभवानंतर मराठी अभिनेत्रीने केली कानउघाडणी

SCROLL FOR NEXT