CNG -PNG Price Esakal
मुंबई

CNG -PNG Price: सर्वसामान्यांच्या खिशाला लागणार कात्री; CNG-PNGच्या दरात होणार वाढ, जाणून घ्या नवे दर

अंकिता खाणे (Ankita Khane)

मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा एकदा झळ बसण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये उद्यापासून म्हणजेच ९ जुलैपासून वाढ होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे मुंबईकरांच्या खिशावर पुन्हा एकदा भार पडण्याची शक्यता आहे. आज रात्रीपासून सीएनजी आणि पीएनजीचे नवे दर लागू होणार आहेत. सीएनजीच्या दरात दीड रुपयांनी तर पीएनजीच्या दरात १ रुपयाने वाढ होणार आहे.

सीएनजी आणि पीएनजीच्या दरामध्ये वाढ करण्याचा निर्णय महानगर गॅस लिमिटेडने घेतला असून आज रात्रीपासून नवे दर लागू होणार आहेत. सीएनजीच्या दरामध्ये दीड रुपयांनी वाढ होणार असून मुंबईकरांना आता एक किलो सीएनजीसाठी ७५ रुपये मोजावे लागणार आहे. तर पीएनजीच्या दरात १ रुपयाने वाढ होणार असून पीएनजीचा दर ४७ रुपयांवरून ४८ रुपये इतका होणार आहे.

सीएनजी गॅसच्या दरामध्ये वाढ होणार असल्यामुळे आता वाहन धारकांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यांना सीएनजीच्या खरेदीसाठी आता जास्त पैसे मोजावे लागणार आहे. सीएनजीच्या दरामध्ये वाढ झाल्यामुळे ऐन पावसाळ्यात आता मुंबईकरांचा प्रवास देखील महाग होण्याची आता शक्यता आहे. कारण मुंबईतील बऱ्याच रिक्षा, टॅक्सी या सीएनजीवर चालतात, त्यामुळे त्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK T20WC: भारताने पाकिस्तानला हरवले, तरीही टेंशन कायम; Semi Final चे ‘स्कोअर’ जुळता जुळेना...

Railway Track मेन्टेनन्स मशीनची समोरासमोर धडक; 5 कर्मचारी जखमी, देखभालीचं काम सुरू असताना घटना

Bigg Boss Marathi 5 Grand Finale LIVE Updates - जान्हवी किल्लेकर ट्रॉफीच्या शर्यतीतून बाहेर; निवडली पैशांची बॅग

IND W vs PAK W: ०.४४ सेकंद! Richa Ghosh ची भारी रिअ‍ॅक्शन, अविश्वसनीय झेल घेऊन पाकिस्तानला दाखवला इंगा

Video : शाळेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांनी गायलं 'अयि गिरि नन्दिनी'; नेटकरी झाले मंत्रमुग्ध, येथे पाहा Viral Video

SCROLL FOR NEXT