मुंबई: मनसुख हिरेन हत्या प्रकरणात काल एन्काऊंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांना (pradeep sharma) अटक करण्यात आली. या अटकेनंतर आता आणखी एक पोलिस अधिकारी NIA च्या रडारवर असल्याची सूत्रांची माहिती आहे. प्रदीप शर्मा यांच्या पीएस फाऊंडेशन मधून पुरावे मिळाले आहेत. त्यामुळे प्रदीप शर्मा यांच्या अडचणीत वाढल्या आहेत. शर्मांच्या अटकेपूर्वी पीएस फाऊंडेशनच्या दोन कर्मचाऱ्यांची चौकशी झाली असल्याची सूत्रांची माहिती आहे. (After pradeep sharma one more officer on radar of nia)
यातील एक कर्मचारी वसईच्या नायगावचा राहणारा आहे. हे दोन्ही कर्मचारी NIAच्या ताब्यात आहेत. काल सकाळी NIA ने प्रदीप शर्मांच्या मुंबईतील घरात छापा (Raid) मारला होता आणि शोधमोहिम सुरू होती. तशातच दुपारच्या सुमारास त्याला अटक (Arrest) करण्यात आली.
प्रदीप शर्माने गुन्ह्यातील पुरावे नष्ट (Destroying Evidence) करण्यास मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. मनसुख प्रकरणात प्रदीप शर्मा यांना NIA ने आधी एक-दोन वेळा चौकशीसाठी बोलावले होते. मात्र काल सकाळी अचानकच प्रदीप शर्माच्या मुंबईतील अंधेरी येथील घरावर NIA ने छापा टाकला.
घसरणीचा काळ
अंडरवर्ल्डच्या संपर्कात असल्यामुळे प्रदीप शर्मांची पोलीस खात्यातून हकालपट्टी करण्यात आली. त्यानंतर २००६ साली रामनारायण गुप्ता उर्फ लख्खन भय्या बनावट चकमक प्रकरणात त्यांचे नाव आले. प्रदीप शर्मा यांच्यावरुन अनेक बॉलिवूड चित्रपट बनवण्यात आले. ऑगस्ट २००८ मध्ये त्यांना पोलीस खात्यातून बडतर्फ करण्यात आले.
लख्खन भय्या बनावट चकमक प्रकरणात २०१० मध्ये त्यांना अटक करण्यात आली. पण जुलै २०१३ मध्ये मुंबई कोर्टाने त्यांची सर्व आरोपांमधून मुक्ततता केली. पण १३ अन्य पोलीस दोषी ठरले. याच प्रकरणाशी संबंधित असलेल्या विनायक शिंदे या पोलिसाला एनआएने अँटिलिया स्फोटक प्रकरणात अटक केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.