डोंबिवली : कल्याण ग्रामीण (Kalyan) परिसरातील चिंचवली गावात (Chinchavali Village) मलंगगड नदीत (Malang gad River) गुरुवारी तीन तरुण पोहण्याचा आनंद घेण्यासाठी गेले होते. परंतु पाण्याचा अंदाज न आल्याने त्यातील दोघे बुडल्याची घटना घडली होती. काळ सायंकाळी 4 वाजल्यापासून या तरुणांचा शोध घेतला जात होता. शुक्रवारी सकाळी अखेर एनडीआरएफ (NDRF) च्या जवानांना पाचारण करण्यात आले. अखेर 20 तासानंतर इशांतचा शोध लागला असून विनायक अजूनही बेपत्ता आहे. ( After Twenty Hours lost Vinayak found by NDRF team vinayak still missing-nss91)
कल्याण ग्रामीण परिसरात पावसामुळे नद्यांना पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. गुरुवारी सांयकाळी 4 च्या सुमारास चिंचवली गावात मलंगगड नदीत तीन तरून पोहण्यासाठी आले होते. त्यातील नकुलला पोहता येत नसल्याने तो नदीत उतरला नाही. मात्र इशांत मोहडीकर (वय 18) व विनायक परब (वय 20) हे पाण्यात उतरले. पाण्याचा प्रवाह वाढून पाण्याचा अंदाज न आल्याने इशांत व विनायक हे नदीपात्रात खेचले जाऊ लागले. त्याच्या मित्राने आरडाओरडा केल्याने ग्रामस्थ त्यांच्या मदतीला धावले.
याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल होताच ग्रामस्थांच्या मदतीने शोधकार्य सुरू करण्यात आले होते अशी माहिती उपसरपंच निलेश म्हात्रे यांनी सांगितले.मात्र अंधार पडल्यानंतर शोधकार्य रात्री थांबविण्यात आले होते. सकाळी पुन्हा तरुणांचा शोध सुरू केला गेला. एनडीआरएफच्या जवानांना नंतर बोलविण्यात आले. सकाळी 12 च्या दरम्यान इशांतचा मृतदेह पाण्यात वाहून आल्याने तो मिळाला. मात्र विनायकचा अजूनही शोध लागलेला नसून त्याचा शोध सुरू आहे.
चोथ्या वेळेने केला घात
विनायक, इशांत हे मुंबईतील महाविद्यालयात शिक्षण घेत होते. त्यांनी नुकतीच बारावीची परीक्षा दिली आहे. मुंबईत राहणारे हे तरुण गुरुवारी पावसाचा आनंद लुटण्यासाठी चिंचवली गावात आले होते. ते यापूर्वीही तीन वेळा येथे आले होते. मात्र गुरुवारी पावसाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा घात झाला. या घटनेची माहिती मिळताच त्यांचे कॉलेजचे मित्र घटनास्थळी आले होते. इशांत विनायक कधी सापडतील याकडे त्यांचे डोळे लागले होते.
नदी पत्रात भोवरा ग्रामस्थही जात नाहीत
विनायक व इशांत हे मलंग नदीत ज्या बंधाऱ्यावर थांबले होते, त्या ठिकाणी भोवरा असल्याने गावातील पट्टीचे पोहणारे तरुणही तेथे जात नाहीत. मात्र इशांत व विनायक याना ही माहिती नसल्याने कदाचित ते तेथे गेले व त्यांना जीव गमवावा लागल्याचे ग्रामस्थ बोलत होते.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.