Malang  Malang Gad: विशालगडा नंतर आता श्री मलंगगड मुक्ती मोहीमेची सुरुवात
मुंबई

Malang Gad: विशालगडा नंतर आता श्री मलंगगड मुक्ती मोहीमेची सुरुवात

Thane: ठाणे जिल्हा प्रशासनाची गडावरील अतिक्रमण विरोधात मोहीम

शर्मिला वाळुंज : सकाळ वृत्तसेवा

Kalyan Latest Update: ऐतिहासिक किल्ले विशालगड अतिक्रमण मुक्ती नंतर आता ठाणे जिल्ह्यातील ऐतिहासिक श्री मलंगगड अतिक्रमण मुक्त मोहीमेस सुरुवात करण्यात आली आहे.

गुरुवारी पहाटे चार वाजल्यापासून जिल्हा प्रशासन व संबंधित विभागाकडून या कारवाईस सुरुवात झाली असून अतिक्रमण केलेली घरे, ढाबे, हॉटेल्स जमिनदोस्त करण्यात येत आहेत. या मोहीमेत 600 हून अधिक कर्मचारी सहभागी झाले आहेत. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून गडावरील वीज पुरवठा देखील खंडीत करण्यात आला आहे.

ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ तालुक्यातील श्री मलंगगडावर गेल्या अनेक वर्षापासून अनधिकृत बांधकामे उभी रहात होती. हे अतिक्रमण दिवसेंदिवस वाढत चालले होते. गडावर अनेक ठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना घडत असून देखील आपला जीव धोक्यात घालत रहिवासी येथे अतिक्रमण करुन वस्ती उभारत आहेत.

वाढत्या वस्तीमुळे हॉटेल्स, ढाबे देखील येथे उभे राहीले होते. दरड घरावर कोसळल्याने यंदा पहिल्याच पावसाळ्यात एका व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला होता. या वाढत्या अतिक्रमणाकडे वन विभागाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने त्यात दिवसेंदिवस वाढ होत होती. सध्याच्या घडीला राज्यात अनधिकृत पब, ढाबे यांच्यावर प्रशासनाकडून जोरदार तोडफोड कारवाई सुरु आहे. ग्रामीण भागातील ढाब्यांवर देखील कारवाई करण्यात येत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तसे आदेशच असून अनेक ठिकाणी ही कारवाई सुरु आहे. याअंतर्गतच श्री मलंगगडावरील कारवाई करण्याचे नियोजन आखताना याठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत मानवी वस्ती वाढल्याची उपरती शासनास झाली असून बेकायदा चाळींवर देखील कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनाच्या या मोहिमेत वन विभाग, महसूल विभाग, उल्हासनगर - अंबरनाथ नगरपालिकेचे अतिक्रमण विभागाचे कर्मचारी सहभागी झाले आहेत. या कारवाईसाठी महसूल विभागाच्या वतीने उप विभागीय अधिकारी उल्हासनगर,तहसीलदार अंबरनाथ,पोलीस उपायुक्त तसेच अतिरिक्त मनुष्यबळ पोलिसांचे तैनात करण्यात आले आहे. पोलिस बंदोबस्तात गुरुवारी पहाटे 4 वाजल्यापासूनच ही कारवाई हाती घेण्यात आली आहे. पहाटेच कर्मचारी कारवाईस असल्याने कोणाला काही समजण्याच्या आतच ही कारवाई सुरु झाली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उसाटने येथील राज्यस्तरीय किर्तन महोत्सवात मोठं विधान केले होते. श्री मलंगगडाच्या बाबतीत जे तुमच्या मनात आहे तेच माझ्या मनात आहे असे विधान मुख्यमंत्री शिंदे यांनी केले होते. यानंतर खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी देखील श्री मलंगगड मुक्ती संदर्भात विधान केले होते.

कोल्हापूरातील ऐतिहासिक विशालगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी शिवसेनेने पुढाकार घेतला होता. यानंतर जिल्हा प्रशासनाने येथील अतिक्रमणावर कारवाई करत विशालगडाला मुक्ती मिळवून दिली होती. आता शिवसेनेच्या वतीने श्री मलंगगड मुक्तीची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर प्रथमच या भागात एवढ्या मोठ्या कारवाईस सुरुवात झाली आहे. आता ही मोहीम यशस्वी होऊन श्री मलंगगड अतिक्रमण मुक्त होतो का हे पहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील १३१०९ मतांची आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT