मुंबई

सफाळ्यात पहाटेची लोकल बंद होण्याच्या निषेधार्थ आंदोलन; प्रवाशांचा ट्रॅकवर ठिय्या

जतिन कदम

पालघर - मुंबईच्या दिशेने जाणारी पहिली लोकल ट्रेन 5.30 वा. बंद होण्याच्या निषेधार्थ आज बुधवार (दि.2) रोजी रोजी सकाळी रेल रोको आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन रोखण्यासाठी मनोर पोलीस स्टेशनहून खास कुमक मागविण्यात आली. यावेळी रेल्वे प्रवाशांनी उस्फूर्तपणे रेल्वे ट्रॅकवर उतरून लोकल थांबवण्याचा प्रयत्न केला व ठिय्या आंदोलन केले.

 सफाळे रेल्वे स्थानकातून दररोज 60 हजार प्रवासी मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. कामाला जाण्यासाठी सकाळची पहिली लोकल डहाणू स्थानकातून 4.15 ला सुटते. ही लोकल कोरोनाचे कारण दाखवून रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील रेल्वेसेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु नंतर अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांना रेल्वेतून प्रवास करण्यास मुभा देण्यात आली होती. त्यानंतर रेल्वे प्रशासनाने ठराविक वेळेत महिला प्रवाशांनाही प्रवास करण्यास मुभा दिली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी रेल्वे प्रशासनाने रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हे नवे वेळापत्रक ३ डिसेंबरपासून लागू होणार आहे. दरम्यान, ३ डिसेंबर पासून अमलात येणाऱ्या नव्या वेळापत्रकामध्ये मुंबईकडे जाणारी पहिली उपनगरीय गाडीची फेरी रद्द केल्याने पालघर आणि सफाळे येथील प्रवाशांनी उत्स्फूर्त रेल रोको केले.

रेल्वे प्रशासनच्या या तुघलकी निर्णयाचा डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था जाहिर निषेध करते व तो निर्णय परत घेण्याचे रेल्वे प्रशासनाला आवाहन करते.

नागदेव पवार,
अध्यक्ष, डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था

दरम्यान, पालघर रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी रेल रोको आंदोलन केले. मेल एक्सप्रेसच्या वेळा बदलल्याने प्रवाशांमध्ये गोंधळ पाहायला मिळाला.

बुधवारपासून मुंबईकडे जाणाऱ्या काही मेल एक्सप्रेसच्या वेळात बदल करण्यात आले आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसला. त्यामुळेच पालघर रेल्वे स्थानकात संतप्त प्रवाशांनी रेल रोको केला.

'-----------------------------------------------------------

( संंपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: उड्डाणादरम्यान नरेंद्र मोदींच्या विमानात तांत्रिक बिघाड, विमानतळावरच अडकून पडले!

Sharad Pawar: शरद पवार यांची पुन्हा भर पावसात सभा, म्हणाले- अनेकवेळा बोलायला उभा राहिलो की पावसाला सुरुवात होते अन्....

BKC Metro Station: मोठी घटना! 40 फूट खोलवर लागली भयंकर आग, अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी

RBI: शक्तीकांता दास RBIचे गव्हर्नर राहणार की राजीनामा देणार? तुमच्या खिशावर काय परिणाम होणार?

...तर त्यांना शिवतीर्थ कसा आशीर्वाद देणार? शिवाजी पार्कवरील मोदींच्या सभेवरून आदित्य ठाकरेंचं टीकास्त्र

SCROLL FOR NEXT