Military aircraft lands successfully during a test at Navi Mumbai International Airport.  esakal
मुंबई

नवी मुंबई विमानतळावर सुखोई फायटरचे यशस्वी लँडिंग! धावपट्टीची चाचणी पूर्ण, एअरपोर्ट कधी सुरू होणार?, पहा थरारक Video...

Sandip Kapde

Navi Mumbai Airport: नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज एक महत्त्वाचा टप्पा पार पडला आहे. आज या विमानतळावर हवाई दलाच्या सुखोई फायटर विमानाचे यशस्वी टेस्ट लँडिंग झाले, ज्यामुळे विमानतळाचे नियमित ऑपरेशन सुरू करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकण्यात आले आहे. या प्रसंगी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. या चाचणीमुळे विमानतळाच्या कार्यक्षमतेवर शिक्कामोर्तब झाले आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यशस्वी लँडिंगसाठी सिडकोला विशेष धन्यवाद दिले. त्यांनी सांगितले की, "आजचा दिवस महाराष्ट्रासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. विरोधकांनी अनेकदा या प्रकल्पावर टीका केली होती, परंतु आम्ही आमच्या वचनांवर ठाम होतो. ९ कोटी प्रवाशांची क्षमता असलेल्या या विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले आहे. या विमानतळाच्या निर्मितीसाठी महायुती सरकारने विशेष योगदान दिले आहे." फडणवीस यांनी सिडकोच्या कामाचे कौतुक केले आणि त्यांच्या मेहनतीमुळे हे यश शक्य झाले असे ते म्हणाले.

विमानतळाच्या पुढील टप्प्याची तयारी-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या यशस्वी चाचणीचे महत्त्व अधोरेखित केले. "आजचा दिवस इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जाईल. या प्रकल्पाची अनेक दिवस प्रतीक्षा होती आणि आजचा हा महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. विजयादशमीच्या एक दिवस आधी झालेल्या या कार्यक्रमामुळे सर्वसामान्य नागरिक आणि प्रवाशांसाठी मोठा आनंद आहे. यशस्वी लँडिंगमुळे आम्ही तयार आहोत, हे सिद्ध झाले आहे."

शिंदे यांनी असेही सांगितले की, "मार्च २०२५ मध्ये हा विमानतळ नियमित प्रवासी सेवेसाठी सुरू होईल. आम्ही वेळेआधीच काम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहोत. विरोधकांनी कितीही विरोध केला तरी आम्ही आमचे काम पूर्ण करू." या विमानतळामुळे हजारो रोजगाराच्या संधी निर्माण होतील, तसेच इथे आयटी पार्क आणि व्यावसायिक केंद्रे उभारली जातील.

नामांकरण आणि आगामी योजना-

या विमानतळाचे नाव दिवंगत नेते दि.बा. पाटील यांच्या नावावर देण्याची शिफारस सरकारकडून केली आहे. पाटील यांनी या प्रकल्पासाठी मोठा संघर्ष केला आहे आणि त्यांचे योगदान अमूल्य आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले की, "आम्ही जे बोलतो ते करतो. हे विमानतळ सर्वसामान्यांसाठी मोठे आश्रयस्थान बनेल, ज्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीला आणखी वेग येईल."

Amit Thackeray: एकनाथ शिंदेंचा त्याग; अमित ठाकरेंसाठी शिवसेना 'हा' मतदारसंघ सोडणार

Latest Marathi News Live Updates: दामोदर शिंगडांचे पुत्र सचिन शिंगडा करणार मनसेत प्रवेश

Kajol Angry At Paparazi : "चप्पल काढून मंडपात या" ; पापाराझींवर काजोल भडकली, म्हणाली....

Noel Tata Net Worth: रतन टाटांचा मौल्यवान वारसा नोएल टाटांच्या खांद्यावर; किती आहे संपत्ती?

DSP Mohammed Siraj: 'दबंग' मोहम्मद सिराज; पोलीस उपअधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला

SCROLL FOR NEXT