भारतातील आघाडीची विमान कंपनी आणि स्टार अलायन्स सदस्य एअर इंडियाने बुधवारपासून आठवड्यातून चार वेळा दिल्ली ते मिलान थेट विमानसेवा सुरू केली.
मुंबई - भारतातील आघाडीची विमान कंपनी आणि स्टार अलायन्स सदस्य एअर इंडियाने बुधवारपासून आठवड्यातून चार वेळा दिल्ली ते मिलान थेट विमानसेवा सुरू केली. नुकत्याच सुरू केलेल्या दिल्ली ते कोपेनहेगन आणि दिल्ली ते विएन्नाला या एयरइंडियाच्या उड्डाणांसह या नवीन विमानसेवेमुळे यूरोपमध्ये एअरइंडियाच्या पाऊलखुणा लक्षणीयरीत्या मजबूत होतील.
एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली ते मिलान ए आय १३७ विमान दर बुधवार, शुक्रवार, रविवार आणि सोमवारी उड्डाने होईल. दिल्लीहून दुपारी २:२० वाजता (भारतीय प्रमाण वेळेनुसार) निघून संध्याकाळी ६:३० वाजता (एलटी) मिलान येथे उतरते. परतीचे विमान ए आय १३७ त्याच दिवशी रात्री ८ वाजता मिलानहून निघून दुसऱ्या दिवशी सकाळी ८ वाजता दिल्लीला पोहोचते. या विमानात १८ बिझनेस क्लास आणि २३८ इकॉनॉमी क्लास सीटस् आहेत. या आधुनिक पुढच्या पिढीच्या बी787-8 ड्रिमलाइनर विमानामार्फत दिली जाणारी दिल्ली-मिलान- दिल्ली सेवामुळे दोन्ही देशातील लाखों पर्यटक, व्यावसायिक आणि कॉर्पोरेट प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
भारतातील पर्यटकांना मिलान हून इयूरिक, रोम, फ्लॉरेन्स, व्हिएन्ना, व्हेनिस, मॉन्टेकार्लो, म्यूनिक, बुडापेस्ट, जिनिव्हा, कॅन्झ आणि कोपेनहेगन या लोकप्रिय शहरांमध्ये रस्त्याच्या मार्गाने सहज प्रवेश मिळेल. इटलीमध्ये असलेले भारतीय वंशाचे लोक आणि भारतीय उपखंडातील विविध शहरांना भेट देण्याचा विचार असलेले आणि आग्नेय आशिया, पूर्व आशिया, काठमांडू आणि अगदी ऑस्ट्रेलियामधील गंतव्य स्थानांवर प्रवास करण्याचा इरादा असलेले इटालियन पर्यटकांना या दिल्ली ते मिलान थेट विमानसेवेचा लाभ होईल.
एयर इंडियाच्या ग्राहक अनुभव विभागाचे प्रमुख आणि ग्राउंड हॅन्डलिंग ग्लोबल प्रमुख राजेश डोग्रा यांच्या उपस्थितीत झालेल्या उद्घाटन समारंभानंतर २०४ प्रवाश्यांसह विमान एआय १३७ दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मिलान कडे वेळेवर निघाले. एयर इंडियाचे वरिष्ठ अधिकारी, जीएमआर आणि एआयएसएटीएस अधिकाऱ्यांसमवेत राजेश डोग्रा यांनी समारंभपूर्वक दीप प्रज्वलन केले आणि फीत कापून नवीन विमान सेवेचे उद्घाटन केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.