मुंबई - बंगळूरहून सॅन फ्रान्सिस्कोला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात एका प्रवाशाला दिलेल्या अन्नामध्ये ‘ब्लेड’ आढळल्याचे या कंपनीने आज कबूल केले. अन्नामध्ये धातूचा तुकडा आढळल्याचा आरोप मागील आठवड्यात एका प्रवाशाने केला होता. ही वस्तू अन्नपुरवठादार कंपनीकडील यंत्राचा तुकडा असल्याचेही ‘एअर इंडिया’ने आपल्या निवेदनात म्हटले आहे.
मागील आठवड्यात मॅथ्यूरेस पॉल या प्रवाशाने त्याला पुरविण्यात आलेल्या अन्नामध्ये ब्लेंडचा तुकडा असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. याबाबत त्यांनी सोशल मीडियावरही पोस्ट केली होती. पॉल यांनी एअर इंडियाशी भागीदारी केलेल्या अन्नपुरवठादार कंपनीला यासाठी दोष दिला होता. हा ब्लेंडचा तुकडा एखाद्या लहान मुलाला किंवा मुलीला पुरविलेल्या अन्नात गेला असता आणि काही नुकसान झाले असते तर?, असा सवालही पॉल यांनी उपस्थित केला होता. या पोस्टनंतर एअर इंडियाने अंतर्गत चौकशी सुरू केली होती.
एअर इंडियाचे मुख्य तक्रार निवारण अधिकारी राजेश डोग्रा यांनी आज निवेदन प्रसिद्ध करत स्पष्टीकरण दिले. ‘‘एका प्रवाशाला पुरविलेल्या अन्नात ब्लेड आढळून आले असून तो अन्नपुरवठादार कंपनीच्या भाजी चिरण्याच्या यंत्राचा एक तुकडा आहे. आम्ही संबंधित प्रवाशाशी संपर्क साधून त्यांची माफीही मागितली आहे. यापुढे असा प्रकार घडू नये यासाठी अन्नाची अधिक तपासणी केली जाईल,’ असे डोग्रा यांनी निवेदनात म्हटले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.