मुंबई

मुंबई उपनगराचे झाले गॅस चेंबर!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मुंबईच्या पश्‍चिम उपनगरांचे डिसेंबर महिन्यापासून गॅस चेंबर झाले आहे. जानेवारी महिन्यातील पहिल्या पाच दिवसांपैकी तीन दिवस बोरिवलीची हवा अतिदूषित होती. मुंबईचे व्यवसाय संकुल म्हणून उभारण्यात आलेल्या वांद्रे-कुर्ला संकुल आणि मालाड येथील हवा एक दिवस अतिदूषित; तर उर्वरित तीन दिवस दूषित श्रेणीत होती. सफर उपक्रमांतर्गत मुंबईतील हवेतील प्रदूषणाच्या पातळीची दररोज नोंद होत आहे. 

रविवारी (ता. 5) मालाडमध्ये सर्वाधिक; तर त्याखालोखाल बीकेसीमध्येही प्रदूषण नोंदवण्यात आले. मालाड येथील प्रत्येक घनमीटर क्षेत्रात हवेत रविवारी तरंगत्या धूलिकणाचे (पीएम 2.5) प्रमाण हे 273 मायक्रोग्रॅम होते; तर बीकेसीमध्ये हे प्रमाण 266 मायक्रोग्रॅम नोंदवण्यात आले. वाहनांची वर्दळ, नवीन बांधकामे यामुळे प्रामुख्याने हा भाग दूषित झाला आहे. भारतीय उष्णकटिबंधीय संस्थेच्या सफर उपक्रमांतर्गत मुंबईतील हवेतील प्रदूषणाची पातळी दररोज नोंदवण्यात येत आहे. 

डिसेंबर महिन्यात वांद्रे-कुर्ला संकुलाच्या परिसरातील हवा आठ दिवस अतिदूषित; तर 23 दिवस दूषित होती. या परिसरातून प्रत्येक तासाला होणारी 13 ते 15 हजार वाहनांची वर्दळ, तसेच मोठ्या प्रमाणात सुरू असलेली बांधकामे आणि धारावी, कुर्ला येथील झोपडपट्टयांमधील बेकायदा कारखान्यांमधून सोडण्यात येणाऱ्या धुरामुळे या परिसरातील हवा विषारी होत आहे. दहिसर टोल नाक्‍यावरून रोज किमान दोन लाखांपर्यंत वाहनांची वर्दळ होते; तर शहरातील वाहनांची संख्या प्रचंड आहे. त्याचबरोबर पश्‍चिम उपनगरात विकास कामेही सर्वाधिक सुरू असून पुनर्विकासही वेगाने सुरू आहे, त्यामुळे हवा अधिक दूषित होते. 

पीएम म्हणजे काय 
हवेतील तरंगते धूलिकण हे दोन प्रकारांत त्यांच्या आकारानुसार मोजले जातात. त्यात पीएम 2.5 म्हणजे 2.5 मायक्रॉनपेक्षा कमी आकार आणि पी एम 10 म्हणजे 10 मायक्रॉनपेक्षा कमी आकार होय. 
हे अतिसूक्ष्म तरंगते धूलिकण श्‍वसनातून फक्त फुफ्फुसातच जात नाही, तर ते रक्तात मिसळतात. त्यामुळे ते हृदयापर्यंत पोहचत असल्याने ते अधिकाधिक घातक मानले जातात. 

जानेवारी महिन्यातील पश्‍चिम उपनगराच्या प्रत्येक घनमीटर हवेतील तरंगत्या धूलिकणाचे (पीएम 2.5) प्रमाण (मायक्रोग्रॅममध्ये) 

जानेवारी बोरिवली मालाड अंधेरी - वांद्रे-कुर्ला संकुल 
2 316 337 213 269 
3 301 263 269 290 
4 314 203 229 302 
5 258 273 199 266 

हवेतील पीएम 2.5 नुसार श्रेणी 

  • 00 ते 50 - शुद्ध 
  • 50 ते 100 - बरी 
  • 100 ते 200 - ठिक 
  • 200 ते 300 - दूषित 
  • 300 ते 400 - अतिदूषित 


डिसेंबर महिन्यात बीकेसीची हवा खराब 

  • - एकदाही हवा श्‍वास घेण्यासारखी नव्हती. 
  • - 26 डिसेंबर सर्वाधिक पीएम 2.5 - 323 
  • - 4 डिसेंबर सर्वांत कमी पीएम 2.5 - 123 
     

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : हेलिपॅडवर बॅग तपासणीसाठी कुणी पुढं आलं नाही, उद्धव ठाकरे म्हणाले- आज मला.....

Nashik Vidhan Sabha Election : कलम 370 वर काय, शेतकरी आत्महत्यांवर बोला; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे

Maharashtra Vidhan Sabha election 2024: पंधरा लाख मतदारांचं ऊसतोडणीसाठी स्थलांतर; हायकोर्टाची निवडणूक आयोगाला नोटीस

Ajit Pawar : 'किंगमेकर' किंवा 'स्पॉयलर' होण्यात मला रस नाही, अजित पवार असं का म्हणाले?

Latest Maharashtra News Updates : आमदार डॉ. मनीषा कायंदे यांची हुसेन दलवाईंवर टीका

SCROLL FOR NEXT