मुंबई

ऐरोली नाका येथील भुयारी मार्गचा तिढा सुटणार, लवकरच काम मार्गी लागणार

शरद वागदरे

मुंबईः ठाणे बेलापूर रोड आणि ऐरोली नाका परिसराला जोडणारा ऐरोली नाका परिसरात बांधण्यात येणाऱ्या भुयारी मार्गचे काम हे लवकरच मार्गी लागणार आहे. नुकतीच पालिका आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीत रेल्वेनं भुयारी मार्गाच्या कामाला ग्रीन सिग्नल दिला आहे. पालिकेनं देखील भुयारी मार्गाचे असणारे नवीन नकाशे रेल्वेकडे सादर केले असून नकाशाला मंजुरी मिळाल्यांनतर हे काम मार्गी लागणार आहे. रेल्वेकडून मंजुरी मिळाल्यांनतर नव्याने प्रस्ताव सादर करण्यात येऊन आयुक्तांची प्रशासकीय खर्चाला मंजुरी मिळाल्यांनतर निविदा काढण्यात येईल.

ऐरोली नाका येथील भुयारी मार्गाचे काम हे मागील आठ वर्षापासून तांत्रिक अडचणीमुळे रखडले होते. या भुयारी मार्गासाठी नवी मुंबई महानगरपालिकेकडून आतापर्यंत चार वेळा निविदा देखील काढण्यात आल्या होत्या. तर ठेकेदार मिळत नसल्यामुळे भुयारी मार्गाचे काम रखडले होते. त्यानंतर कार्यकारी अभियंता गिरीष गुमास्ते यांनी ऐरोली विभाग कार्यालयाची सुत्रे हाती घेतल्यांनतर  भुयारी मार्गाच्या कामासाठी रेल्वेकडे पाठपुरावा करण्यास सुरुवात केली. यानंतर  रेल्वेला महानगरपालिकेकडून नवीन आरखडा बनवून नवीन प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. 

नुकतीच पालिका आधिकारी आणि रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भुयारी मार्गाची पाहणी केली असून रेल्वे आणि पालिकेच्या अधिकांऱ्यासोबत झालेल्या बैठकीत या रेल्वेकडून हिरवा कंदील दर्शवण्यात आला आहे. रेल्वेकडून मंजुरी मिळाल्यांनतर आयुक्ताकडून प्रशासकीय मंजुरी मिळाल्यांनतर रेल्वेच्या भुयारी मार्गाचे काम मार्गी लागणार आहे. 

ठाणे बेलापूर मार्गावरील चिंचपाडा आणि ऐरोली नाका या परिसरातील नागरिकांना जीव मुठीत धरुन रेल्वे लाईन ओलाडंत प्रवास करावा लागत आहे. अनेकदा रेल्वे लाईन ओलांडताना अपघात देखील झाले आहेत. तर शालेय विद्यार्थ्यांना याचा त्रास देखील होत आहे. ऐरोली नाका, ऐरोली गांव, शिवकॉलनी, महावितरण वसाहतीमधील नागरिकांना ठाणे बेलापूर मार्गावर जाण्यासाठी ऐरोली सेक्टर तीन येथील भुयारी मार्गातून द्रविडी प्राणायम करत जावे लागत आहे. 

वाहन चालकांसह नागरिकांचा प्रवास सुलभ व्हावा यासाठी नगरसेवक अनंत सुतार यांनी भुयारी मार्ग उभारण्यासाठी पाठपुरावा केला होता. महानगरपालिकेनं चार वेळा ऐरोली नाका येथील भुयारी मार्गासाठी निविदा काढली होती. मात्र संबंधित काम अत्यंत किचकट असून रेल्वे प्रशानसनाच्या उदासीनतेमुळे आणि असहकार्यामुळे रखडले होते. रेल्वेकडे पालिकेने 23 सप्टेंबर 2013 ला डिपॉझिट चार्जेस म्हणून 37 लाख 32 हजार 500  रुपये देखील भरले आहे. मात्र रेल्वेकडून उच्च दाबाची विद्युत वाहिनी असल्यामुळे उड्डाणपूल बांधता येणार नसल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर पालिकेकडून नव्याने प्रस्ताव रेल्वेकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावाला रेल्वेकडून मंजुरी मिळाली आहे.  संबंधित भुयारी मार्गामुळे ऐरोली नाका परिसर ठाणे बेलापूर मार्गाला जोडला जाणार असून अनेकांचे प्राण देखील रेल्वे लाईन ओलांडताना वाचणार आहे.

ऐरोली नाक्यावरील भुयारी मार्गासाठी रेल्वेकडे नव्याने नकाशे सादर करण्यात आले आहे. तसेच नुकतीच रेल्वे आणि पालिका अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत भुयारी मार्गाच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे. रेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत भुयारी मार्गाचा पाहणी दौरा देखील झालेला आहे. त्यामुळे रेल्वेची मंजुरी आल्यांनतर काम मार्गी लागणार आहे.
गिरीश गुमास्ते, कार्यकारी अभियंता नवी मुंबई महानगरपालिका

भुयारी मार्ग झाल्यास नागरिकांचा प्रवास सुखकर

ऐरोली नाका येथे भुयारी मार्ग झाल्यास ठाणे बेलापूर रस्त्यावरुन ऐरोली नाका येथे जाणे सोपे होणार आहे. हा भुयारी मार्ग झाल्यास भारत बिजली आणि ऐरोली रेल्वे स्टेशन येथील भुयारी मार्गावरचा ताण कमी होणार असून नित्यांचीच झालेली भारत बिजली येथील वाहतूक कोंडी फुटणार आहे.

ऐरोली नाका येथील वखारी पासून ठाणे बेलापूर मार्गावरील चिचंचाडा येथे रेल्वे ट्रॅकच्या खालून बांधण्यात येणार आहे. सुमारे 200  मीटरचा भुयारी मार्ग बांधण्यात येणार आहे. या भुयारी मार्गातुन पादचाऱ्यांसह वाहने देखील जाणार आहे.

भुयारी मार्गाच्या खर्चात वाढ

ऐरोली नाका येथील भुयारी मार्गाचा प्रस्ताव हा 2013 मध्ये  बनवण्यात आला होता. त्यावेळी भुयारी मार्गाचा खर्च हा 34 कोटी रुपयांपर्यत होता. मात्र आता त्यामध्ये वाढ होणार असून भुयारी मार्गासाठी 41 कोटी रुपये खर्च होणार आहे. रेल्वेला देखील अनामत रक्कम म्हणून 37 लाख 32  हजार 500 रुपये भरले होते. त्यामध्ये देखील वाढ होणार आहे.
----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Airoli Naka tunnel work will start soon

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT