Ajit Pawar-Sharad Pawar esakal
मुंबई

मलिकांवरील कारवाईनंतर घडामोडींना वेग, पवारांकडून तातडीची बैठक

ओमकार वाबळे

Nawab Malik Arrested by ED | महाविकास आघाडी सरकारचे मंत्री नवाब मलिक यांच्यावर ईडीने छापे टाकले. यानंतर त्यांना अटक करण्यात आली. मलिकांवरील कारवाईनंतर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत महत्वाचे मंत्री मंत्रालयात दाखल झाले असून तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. (ED arrested Nawab Malik)

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री छगन भुजबळ उपस्थित असल्याचं कळतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्र्यांना फोन करून सर्व प्रकरणाच्या अपडेट्स घेतल्या आहेत.

दरम्यान, शरद पवार यांनीही राष्ट्रवादीच्या महत्वाच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्यासाठी पक्षातील बडे नेते उपस्थित असतील. लवकरच शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही बैठक होण्याची शक्यता आहे. यासोबतच मलिक राजीनामा देण्याची शक्यता वाढली आहे. (Uddhav Thackeray Calls Meeting over Nawab Malik Money Laundering Probe)

अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत. सलग आठ तासांच्या चौकशीनंतर मलिक यांना अखेर अटक करण्यात आली आहे. मलिक यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालयाने छापे टाकले. त्यानंतर सकाळपासून त्यांची चौकशी सुरू होती. (Nawab Malik ED Enquiry News)

एकूण चार मालमत्तांची चौकशी सकाळपासून सुरू होती. मलिक यांच्या कुटुंबीयांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याची पडताळणी ईडीकडून सुरू होती. छोटा शकील आणि हसीना पारकर जिवंत असताना त्यांच्या निगडीत काही व्यवहार झाले होते.

ईडीला यासंदर्भात संशय होता. अखेर ईडीने मलिकांना अटक केली आहे. त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी नेण्यात आले असून चोवीस तासात कोर्टात हजर करण्यात येणार आहे. यावेळी ईडीकडून मलिकांची रिमांड घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी माहिती मिळत आहे. (Nawab Malik Arrested by ED)

१९९३ चा बॉम्बस्फोट आणि नवाब मलिक

नवाब मलिक यांच्या घरी सकाळी साडे सहा वाजता ईडीचे अधिकारी धडकले. अंडरवर्ल्डशी संबंध असण्याची शक्यता असल्याने ईडीने घरात काही तपासणी केल्याची माहिती देखील मिळत आहे. याआधी अंडरवर्ल्डशी संबंधित इक्बाल कासकर तसेच अन्य काही व्यक्तींची चौकशी करण्यात आली होती. त्यांच्या खात्यात काही आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती ईडीकडे असल्याचं समोर आलं आहे. दाऊद इब्राहिमशी संबंधित काही व्यक्ती आणि खात्यांमधून मलिक यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे संबंध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

१९९३ च्या बाँम्बस्फोटातील एका आरोपीची जमीन मलिकांनी विकत घेतली होती. यासंदर्भात काही आर्थिक व्यवहारांची उकल ईडीकडून केली जात असल्याचं समोर आलंय. (ED Raids on Nawab Malik house)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

IND vs AUS: 'मी तुझ्यापेक्षा फास्ट बॉलिंग करतो...', मिचेल स्टार्कची हर्षित राणाविरुद्ध स्लेजिंग; पाहा Video

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

SCROLL FOR NEXT