Budget Session 
मुंबई

Budget Session : अजित पवारांचा खट्याळपणा, शंभूराज देसाईंच्या पायावर दिली बुक्की!

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर हल्लाबोल करत आहेत. आज सभागृहात जोरदार खडाजंगी उडाली. मात्र विधानभवनाच्या पायऱ्यांवर हलके-फुलके वातावरण पाहायला मिळाले.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचा स्वभाव सर्वांना माहिती आहे. ते कठोर तेवढे विनोदी देखील आहेत. त्यांच्या खट्याळ स्वभावाचे दर्शन आज झालेय. आज विधानभवनाच्या पायऱ्यांवर अजित पवार यांनी शंभूराज देसाई यांना पायावर बुक्की दिली. 

धुळ्याचे आमदार फारूक शहा हे आपल्या विभागातील काही प्रश्न घेऊन विधानभवनाच्या पायऱ्यांवर आज उपोषणाला बसले. यावेळी अजित पवार आणि मंत्री शंभूराज देसाई सुद्धा पायऱ्यांवर शहा यांची भेट घेत होते. त्यावेळी शहा यांची समजूत काढल्यानंतर सर्व एकत्र येऊन फोटो काढत होते. यावेळी अजित पवार यांनी शंभूराज यांना चेष्टत बुक्की दिली. 

दरम्यान आज अधिवेशन देखील चांगलेच गाजले. दादा भुसे यांनी शरद पवार यांचा एकेरी उल्लेख केल्याने विरोधकांनी चांगलाच हल्लाबोल केला. अजित पवार देखील आक्रमक झाले होते. त्यांनी शरद पवार यांचा केलेला उल्लेख रेकॉर्डवरुन काढून टाकण्याची आणि दिलगिरी व्यक्त करण्याची मागणी केली.

संजय राऊत हे मातोश्रीची भाकरी खाऊन चाकरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार यांची करतात असा टीका दादा भुसे यांनी केली होती. त्यावरून विधानसभेत मोठा गदारोळ झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व आमदार आक्रमक झाले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

FIDE World Championship: भारताच्या डी गुकेशचं पराभवानंतर दुसऱ्या फेरीत कमबॅक, लढत ड्रॉ राखण्यात यश

Manoj Jarange Patil: ''एकदा सरकार स्थापन होऊ द्या.. तुम्ही तयारीला लागा'' मनोज जरांगे यांचं मराठा समाजाला आवाहन

ZIM vs PAK: १४६ धावांचे लक्ष्य एकट्याने चोपल्या ११३ धावा! २२ वर्षीय पाकिस्तानी फलंदाजाची हवा

Islamic Country: 'या' मुस्लिम देशात भारतीय लोक खरेदी करत आहेत मोठ्या प्रमाणावर प्रॉपर्टी; जाणून घ्या कारण

Medical Research : जगातले श्रीमंत लोक शोधतायेत अमर होण्याचे औषध, उंदरावर केलेला प्रयोग

SCROLL FOR NEXT