मुंबई - २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात चौथा भूंकप आज पाहायला मिळाला आहे. एरवी सत्ताधारी भाजपवर सातत्याने टीका करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली आहे. अजित पवार दिग्गज नेत्यांना घेऊन भाजपमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
एकनाथ शिंदे म्हणाले, की अजित पवारांचे अभिनंदन करतो. विकासाच्या राजाकरणाला दादांनी साथ दिली आहे. कर्तृत्वान कार्यकर्त्याला जेव्हा दुय्यम स्थान दिलं जातं तेव्हा काय होतं, हे आपण यापूर्वी पाहिले आहे. आता डबल इंजिनचं सरकार ट्रिपल इंजिनचं झालं आहे. महाराष्ट्रातील जनतेला विकास पाहायला मिळेल, असा दावा शिंदे यांनी केला.
दरम्यान सरकाराचा आता तातडीने मंत्रीमंडळ विस्तार होईल. आता एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आहे. त्यामुळे सरकार वेगवान होईल. अजित पवार यांचं स्वागतच आहे. त्यांच्या अनुभवाचा सरकार आणि जनेतेला फायदाच होईल असही शिंदे म्हणाले.
अजित पवार
छगन भुजबळ
दिलीप वळसे पाटील
हसन मुश्रीफ
धनंजय मुंडे
धर्माराव अत्राम
आदिती तटकरे
संजय बनसोडे
अनिल पाटील
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.