मुंबई

वैधानिक मंडळे घोषित करण्याबाबत अजित पवारांची स्पष्ट भूमिका; फडणवीस म्हणतात, "दादांच्या पोटातले ओठांवर आले"

सिद्धेश्‍वर डुकरे

मुंबई, ता.1: ज्या दिवशी 12 आमदारांची नावे घोषित होतील त्यादिवशी वैधानिक मंडळे घोषित करू, असे विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनास सुरूवात झाल्यावर सभाहगृहात ठणकावून सांगितले. विकास मंडळाबाबतच्या सत्ताधाऱ्यांच्या भुमिकेवर विरोधी पक्षाने निषेध नोंदवत सभात्याग केला.

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पी  अधिवेशनास आजपासून मुंबईत सुरूवात झाली. विधानसभेचे कामकाज सुरू झाल्यावर विकास महामंडळाच्या पुनर्स्थापनेचा विषय समोर आला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी वैधानिक विकास महामंडळावरून सरकारला धारेवर धरले. 

यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, उपमुख्यमंत्र्यांनी 15 डिसेंबर 2020रोजी  विदर्भ वैधानिक विकास महामंडळाची स्थापना केली जाईल अशी घोषणा केली होती. त्या घोषणेला आज 72 दिवस झाले. ती घोषणा अद्याप झाली नाही. पुरवणी मागणीच्या संदर्भात अजित पवारांनी सांगावे की विकासाचा समतोल साधलेला आहे. म्हणजे मग आज रात्री बसून आम्ही ती सगळी आकडेवारी टॅली करून बघू की खरेच विकास झाला आहे किंवा नाही. आणि समतोल विकास नसेलच, तर तसे तरी सांगावे. म्हणजे ती आकडेवारी टॅली करण्याची गरजच पडणार नाही,असेही  मुनगंटीवार म्हणाले.

त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून सुरू असलेल्या सरकारची अडवणुकीकडे लक्ष वेधले. विकास महामंडळळे आम्ही स्थापन करू. बजेटमध्ये मी तसा निधी देईन. ज्या दिवशी राज्यपाल 12 आमदारांची नावे जाहीर करतील त्या दिवशी आम्ही वैधनिक विकास मंडळ घोषित करू, असे पवार म्हणाले.

पवारांनी 12 आमदारांचा विषय उपस्थित करताच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. ते म्हणाले की, दादांच्या पोटातले आता ओठांवर आले. 12 आमदारांसाठी मराठवाडा, विदर्भातल्या लाखो लोकांना ओलीस ठेवले आहे का, असा सवाल फडणवीसांनी उपस्थित केला.

आम्ही जे मागत आहोत, ते आमच्या हक्काचे आहे. तुम्ही आम्हाला भीक देत नाही. तुम्ही देणार नसाल, तर आम्ही भांडून मिळवू, आमचे म्हणणे ऐकले जात नसेल तर आम्ही एक मिनिट सभागृहात बसणार नाही. कामकाज रेटून न्यायचे असेल तर आम्हाला बसवता कशाला, अशा शब्दांत त्यांनी हल्लाबोल केला.

तर काँग्रेसचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष  आमदार नाना पटोले यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानाचा धागा पकडत  विरोधकांवर खोचक शेरेबाजी केली.  पटोले म्हणाले की, माझी उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे की गेल्या 5 वर्षांमध्ये विदर्भ आणि मराठवाड्याचा बॅकलॉग वाढला का? याचीही माहिती आपण सभागृहाला दिली पाहिजे. मुनगंटीवारांच्या रात्रीच्या वक्तव्याचा संदर्भ देऊन पटोले म्हणाले की, हे रात्री आणि पहाटेच्याच गोष्टी करतात. ते तसे का करतात, मला अजून कळले नाही, असे पटोले म्हणाले. असे म्हणताच सभागृहात सत्ताधारी आणि विरोधी बाकांवर हशा पिकला!

ajit pawar we will announce the legislative boards on the day the names of 12 MLAs will be announced

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: विधानसभा निवडणुका जिंकण्याचा एकनाथ शिंदेंचा हा आहे 'मास्टर प्लॅन'; ठाण्यात नाही तर 'या' ठिकाणी ठोकणार तळ

SA vs IND: मी फार विचार केला, तर इमोशनल होईन; १० वर्ष मी वाट पाहिली! Sanju Samson ने मैदानासोबत मनंही जिंकली

शेतकऱ्यांची होणार संपूर्ण कर्जमाफी! राज्यातील साडेपंधरा लाख शेतकरी थकबाकीत; कर्जमाफीसाठी लागणार 30,495 कोटी; जाणून घ्या, जिल्हानिहाय थकबाकीदार शेतकरी

Raju Patil: ...यांच्या नियत मध्ये खोटं आहे, त्याप्रमाणे घडलं; खासदार डॉ. शिंदेंनी मैत्री न निभावल्याने मनसे आमदार पाटील दुखावले

Sakal Podcast: ‘TET’ परीक्षेवर राहणार ‘AI’ची नजर ते रश्‍दींच्या ‘द सॅटनिक व्हर्सेस’ पुस्तकावरील बंदी उठवली

SCROLL FOR NEXT