Akshay Shinde’s encounter by police sparks political controversy in Maharashtra, raising questions about the involvement of school trustees in the Badlapur rape case esakal
मुंबई

Akshay Shinde Encounter: अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर होताच शाळेशी संबंधित फरार आरोपींची जामिनासाठी हायकोर्टात धाव

Sandip Kapde

Latest Marathi Crime News Updates: बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा काल पोलिसांनी एन्काऊंटर केला, ज्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा गदारोळ निर्माण झाला आहे. या घटनेमुळे शाळेशी संबंधित दोन फरार आरोपींना त्वरित अटकपूर्व जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली. अटकपूर्व जामीनाची याचिका दाखल केल्यानंतर सत्र न्यायालयाने ती फेटाळल्यानंतर त्यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.

या प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय शिंदे याच्यावर दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराचा आरोप होता. पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयीन चौकशीसाठी नेत असताना शिंदेने पोलिसाची बंदूक हिसकावून फायरिंग केल्याचे सांगितले जाते, ज्यामुळे त्याच्यावर आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी प्रत्युत्तरात गोळीबार केला आणि त्याचा मृत्यू झाला.

फरार आरोपींची हायकोर्टात धाव-

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर होताच शाळेशी संबंधित दोन फरार आरोपींनी अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी हायकोर्टात धाव घेतली. त्यांची याचिका दाखल झाली असून, न्यायालयाने तातडीचा दिलासा देण्यास नकार दिला आहे. पुढील सुनावणी १ ऑक्टोबरपर्यंत तहकूब करण्यात आली आहे. सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर त्यांनी ही पाऊले उचलली आहेत.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया-

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की, "अक्षय शिंदेवर त्याच्या पत्नीने लैंगिक अत्याचाराचा आरोप लावला होता आणि त्याच्या चौकशीसाठी नेले जात असताना त्याने पोलिसावर गोळी झाडली. पोलिसांनी आत्मसंरक्षणात गोळीबार केला. यावर कोणत्याही प्रकारची राजकारण करणे योग्य नाही."

गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या घटनेवर भाष्य करत सांगितले की, "अक्षय शिंदेने पोलिसाची बंदूक हिसकावून गोळीबार केला, ज्यामुळे पोलिसांनी आत्मसंरक्षणासाठी प्रत्युत्तरात गोळीबार केला."

विरोधकांची टीका आणि न्यायालयीन चौकशीची मागणी-

या एन्काऊंटरनंतर महाराष्ट्रात विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी या एन्काऊंटरची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी केली आहे. अनिल देशमुख यांनी अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर संशय व्यक्त केला आहे. देशमुख यांनी म्हटले की, "दोन्ही हातांनी बेड्या घातलेल्या व्यक्तीने पोलिसाची पिस्तूल कशी हिसकावली? शाळेचे ट्रस्टीसुद्धा या प्रकरणात दोषी आहेत, मात्र त्यांना वाचवण्यासाठी मुख्य आरोपीचा एन्काऊंटर करून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला जात आहे."

शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनीही या एन्काऊंटरवर प्रश्न उपस्थित केले आहेत. पाटील यांनी सांगितले की, "अक्षय शिंदेवर चौकशी झाली असती, तर शाळेतील आरोपींचे नाव पुढे आले असते आणि पोलिसांचीही प्रतिमा उघड झाली असती."

वर्षा गायकवाड यांची सीबीआय चौकशीची मागणी-

काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागितला आहे. त्यांनी विचारले की, "अक्षय शिंदेला पोलिसांच्या ताब्यात असताना बंदूक कशी मिळाली? याची सीबीआय चौकशी होणे आवश्यक आहे. आरोपी अक्षय शिंदेचा एन्काऊंटर हा मोठा प्रश्न उपस्थित करतो. महिलांची राज्यात सुरक्षितता धोक्यात आली आहे."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pulwama Attack 2019: कोण होता बिलाल अहमद कुचाय? 40 जवानांचा जीव घेणाऱ्या दहशतवाद्यांना दिला होता आश्रय, जम्मूमध्ये झाला मृत्यू

Pune University Road Traffic: प्रवाशी नाश्ता करून आले तरी गाडी जागची हालेना; विद्यापीठ चौकातील ट्राफिकमुळे पुणेकरांची कोंडी

SBI Balance Check Tips : घरबसल्या चेक करा लाडक्या बहिणीचा तिसरा हप्ता बँकेत जमा झाला काय; या आहेत सोप्या ट्रिक्स

IND vs BAN 2nd Test: टीम इंडियाची साथ सोडून स्टार फलंदाज मुंबईत परतणार; BCCI मान्यता देणार

Sharad Pawar: पवारांच्या खेळीने सळगेच अवाक, ठाकरेंच्याच नेत्याला घेतल आपल्या पक्षात

SCROLL FOR NEXT