Alchoholic sakal media
मुंबई

मद्यपानाच्या व्यसनामुळे यकृताचे आजार वाढले; यामागची कारणे जाणून घ्या

भाग्यश्री भुवड

मुंबई : हृदय, फुफुसे, किडनी आणि  मेंदू याप्रमाणे यकृत सुद्धा हा शरीरातील महत्वाचा (imp body organs) अवयव असून तो सर्वात जास्त दुर्लक्षित अवयव सुद्धा आहे. साखरेच्या स्वरूपात ऊर्जा जमवणे, निकाम्या लाल रक्तपेशी वर प्रक्रिया करणे, जीवनसत्वांचा साठा जमवणे, शरीराला आवश्यक असलेल्या क्षारांचा साठा करणे, आतड्यातून शरीरात जाणाऱ्या जंतूचा नायनाट करणे अशी अनेक कामे यकृत (Liver) करत असते. मात्र, गेल्या दोन वर्षात कोरोनाच्या महामारीमुळे (corona pandemic) आणि बैठ्या जीवनशैलीमुळे यकृताचे आजार वाढत (liver decease) असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी (doctors reports) मांडले आहे. तसेच, यासाठी नागरिकांमध्ये वाढत्या दारूचे व्यसन (Alcohol drinking) हे सुद्धा एक महत्वाचे कारण समोर येत आहे.

याविषयी डॉ. तुषार ठेंगणे यांनी सांगितले, " भारतीयांमध्ये लठ्ठपणा वाढल्याने मधुमेह, हृदयविकार, सांधेदुखी सारखे आजार जडत आहेत. त्याचबरोबरीने यकृताचे आजार बळावत आहे. 10 पैकी 3  भारतीयांना यकृतातील मेदाचा (फॅटी लिव्हरचा) त्रास झालेला आहे. वेळी अवेळी खाणे - पिणे, एकाच ठिकाणी बसून काम करणे, कोरोनामुळे आर्थिक आणि कौटुंबिक अडचणीमुळे होणारा मानसिक ताण तणाव आणि एकूणच समाजामध्ये वाढलेले मद्यपानाचे प्रमाण यामुळे यकृताचे आजार वाढत आहेत. "

दारु यकृतासाठी घातक

शहरातील 100 नागरिकांपैकी 30 जणांना यकृतातील मेदवाढीचा आजार जडलेला आहे. दारूमुळे यकृतामध्ये इथानोल जाते, कमी प्रमाणात इथानोल यकृत पचवते. परंतु, जास्त प्रमाणात याचे प्रमाण शरीरात गेल्यावर ते यकृत खराब करते. दारूचे सेवन केल्यानंतर आपल्या पेशीमध्ये फ्री ऑक्सिजन रॅडीकलला हाताळण्यासाठी एक प्रणाली असते. इथोनोलमुळे अल्डीहाईडचे प्रमाण जास्त झाले तर जास्त फ्री रॅडिकल्स तयार होतात. मग, त्यांना हाताळणारी शरीरातील यंत्रणा पूर्णपणे थकून जाते. अशा वेळी अजून नवीन फ्री रॅडीकल तयार झाले तर पेशींना इजा जास्त होते. अल्डीहाईड हा घटक  यकृताच्या पेशीसाठी धोकादायक ठरतो.

काही चुकीच्या पद्धतींमुळे, औषधांमुळे किंवा किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष केल्याने ब-याचदा एखादा मोठा आजार डोकं वर काढतो. थकवा जाणवणे, भूक न लागणे, वजन कमी होणे, पायाला सूज येणे, उलटीतून रक्त पडणे अशी लक्षणे आढळली तर तत्काळ वैद्यकीय सल्ला घेणे गरजेचे आहे असे आवाहन डॉक्टरांनी केले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगभरात दरवर्षी होणार्‍या मृत्यूंपैकी 6 टक्के मृत्यू दारूमुळे होतात.

अधिक दारू पिण्याचा परिणाम दोनशेहून अधिक आजाराशी संबंधित आहे. मद्याच्या सतत सेवनामुळे यकृतावर वाईट परिणाम होतो. हळूहळू यकृत आकुंचन पावते. पेशी काम करेनाशी होतात. या स्थितीला लिव्हर सिऱ्हॉसिस म्हणतात. मद्याच्या अधिक सेवनामुळे मृत्यूही ओढावू शकतो.स्टडीज ऑन अल्कोहोल अ‍ॅण्ड ड्रग्जच्या सर्वेक्षणानुसार, कमी वयात दारूचे व्यसन लागल्यास ती सोडल्यावर त्याचे परिणाम दीर्घ वयापर्यंत दिसून येतात. त्यामुळे, वय वाढल्यावर अनेक आरोग्य समस्या निर्माण होतात. लिव्हरचे काम कमी झाले तर आपल्याला आरोग्याचे वेगवेगळे त्रास सुरू होतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Elections Result: महाराष्ट्राबाहेरची 'ही' जोडी ठरली भाजपची किंगमेकर...अशाप्रकारे मिळवून दिला महायुतीला बंपर विजय

IND vs AUS 1st Test : अपर कट अन् शतक! Yashasvi Jaiswal ची ऑस्ट्रेलियात सेंच्युरी; ४७ वर्षांपूर्वीच्या गावस्करांच्या विक्रमाशी बरोबरी

IPL 2025 Mega Auction LIVE: आयपीएलचा मेगा लिलाव आज! ऋषभ पंत, श्रेयस अय्यर, केएल राहुलसह मोठे स्टार आज रिंगणात!

Who Is Maharashtra CM: शिंदेंना मान्यता मिळणार की फडणवीस महाराष्ट्राची कमान सांभाळणार? मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोण पुढे?

मंगळवारी मंत्रिमंडळाचा शपथविधी! सोलापूर जिल्ह्यातील एका आमदाराला मिळणार कॅबिनेट मंत्रिपदाची संधी? विजयकुमार देशमुख, सुभाष देशमुखांची नावे चर्चेत

SCROLL FOR NEXT