Hapus Mango: कोकणातील हापूस आंब्यासारखा चवीला आणि रंगाला हुबेहूब दिसणाऱ्या आफ्रिका खंडातील मालावी देशाचा हापूस आंबा दिवाळीच्या मुहूर्तावर वाशीतील एपीएमसी मार्केटमध्ये डेरेदाखल झाला आहे. या आंब्याला प्रतिकिलो ४ हजार ते ५ हजार ५०० पर्यंत भाव मिळाला असून अवघ्या दहा मिनिटांत साडेपाचशे पेट्यांची विक्री झाली आहे.
आफ्रिका खंडात उन्हाळा सुरू असल्यामुळे मालावी देशातील हापूसचे आगमन झाले आहे. कोकणातील हापूसशी साधर्म्य असल्यामुळे या आंब्याला आफ्रिकेतही हापूस नावानेच संबोधले जाते. तीन ते सव्वा तीनशे किलो ग्रॅम वजनाचा हा आंबा खाण्यासाठी अगदी कोकणातील हापूस आंब्यासारखा लागतो.
त्यामुळे बाजारात आल्यावर ६०० बॉक्सची विक्री झाल्याची माहिती संजय पानसरे यांनी दिली. अशातच सध्या आफ्रिकेत १५ ऑक्टोबर ते १५ डिसेंबर या कालावधीत हापूसचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे डिसेंबरअखेरपर्यंत हा आंबा एपीएमसी मार्केटमध्ये विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहे. त्यानंतर मार्चमध्ये मात्र कोकणातील हापूस आंब्याचा हंगाम सुरू होणार असल्याने तोपर्यंत मालावीचा हापूस हा नवी मुंबईकरांसाठी पर्याय ठरणार आहे.
कोकणच्या हापूसची अफ्रिकेत लागवड
मालावीतील मँगो कंपनीने दहा वर्षांपूर्वी रत्नागिरी व दापोली येथील हापूस आंब्याच्या फांद्या आयात केल्या होत्या. या फांद्यांवर संशोधन करून त्यापासून आंब्याची कलमे तयार करून तब्बल ४५० एकर जागेत फळबाग केली. हा प्रयोग यशस्वी झाल्यावर आंबा विक्रीसाठी पाठवण्यास सुरुवात केल्याची माहिती फळ व्यापारी संजय पानसरे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.